हत्येच्या आरोपात त्याला कारागृहात डांबण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या भीतीपोटी त्याला ४५ दिवसांसाठी जामिनावर बाहेर सोडण्यात आले.तो त्याच्या लकडगंजमधील जुनी मंगळवारीतील घरी पोहचला अन् त्याला धक्का बसला. त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. तो प्रचंड संतापला. बेवफा पत्नी आणि तिच्या प्रियकराला संपवण्याच्या इराद्याने तो रोज चाकू घेऊन इकडे तिकडे त्या दोघांना शोधू लागला. या शोधमोहिमेत त्याच्या पॅरोलची मुदत संपली. परंतु तो कारागृहात परतला नाही. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेऊ लागले. शनिवारी रात्री गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चाैधरी आणि त्यांचे सहकारी गुन्हेगारांचा शोध घेत असताना गंगाबाई घाट चौकाजवळ बाराहाते त्यांच्या नजरेस पडला. त्याला लगेच पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून ॲक्टिव्हा दुचाकी आणि चाकू जप्त करण्यात आला.
----
अन् मोठा गुन्हा टळला
पोलिसांनी आरोपी बाराहातेला अटक केली. त्याला शनिवारी रात्री पोलिसांनी बोलते केले अन् बाराहातेने पोलिसांना जे सांगितले ते धक्कादायक होते. तो अनेक दिवसांपासून पत्नी आणि तिला पळवून नेणाऱ्या प्रियकराला शोधत होता त्यांची हत्या करण्याच्या उद्देशाने. पोलिसांनी त्याला पकडले नसते तर त्याने मोठा गुन्हा केला असता.
----