मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग १५ जानेवारीपासून अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया देशभरात राबविण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. केंद्र सरकारची हॉलमार्किंगची नियमावली पाळण्यास सराफा तयार आहेत, पण हॉलमार्कची जबाबदारी ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड (बीआयएस) स्वीकारणार काय, असा सराफांचा सवाल आहे.
पूर्वतयारी न करता कायदा लागूसोना-चांदी ओळ कमेटीचे सचिव राजेश रोकडे यांनी सांगितले की, केंद्राने हॉलमार्कची सर्व जबाबदारी सराफांवर टाकली आहे. हॉलमार्किंग लागू केल्यानंतर व्यवसाय करण्यासाठी सराफा व्यावसायिक सर्वच नियमांचे नक्कीच पालन करतील. एक लाखाचा दंड आणि एक वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद असल्याने काटेकोर पालन करतील. सरकारने हॉलमार्किंग पूर्वतयारी न करताच लागू केल्याचा सर्वच सराफांचा आरोप आहे. विदर्भात बीआयएसचे हॉलमार्किंगचे नागपुरात दोन आणि अकोल्यात एक असे तीन सेंटर आहे. तिन्ही सेंटरमध्ये एका दिवशी विदर्भातील सराफांचे किती दागिने हॉलमार्किंग करणार, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हॉलमार्किंग सेंटरपर्यंत प्रवास करताना दागिन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात सेंटर उभारले असते तर सराफांना दागिन्यांना हॉलमार्क करणे सोपे झाले असते, असे मत रोकडे यांनी व्यक्त केले.
हॉलमार्किंग कायदा वृत्तपत्रातून कळलाहॉलमार्किंगचा कायदा आम्हाला वृत्तपत्रातून कळला. हॉलमार्किंग आणि त्याच्या नियमावलीचे साधे पत्र बीआयएसने असोसिएशनला अजूनही पाठविले नाही किंवा अधिकाऱ्यांनी यासंदर्भात चर्चाही केली नाही. त्यामुळे नागपुरातील जवळपास ३ हजार सराफांना हॉलमार्किंगची नियमावली सांगणे कठीण आहे. नागपुरात २०० च्या आसपास बीआयएस नोंदणीकृत सराफा आहेत. नोंदणी कशी करायची, याची माहिती सराफांना नाही. याकरिता बीआयएसच्या अधिकाऱ्यांना चर्चासत्र आणि कार्यशाळा घेण्याची गरज आहे. कायद्यातील त्रूटी दूर करून त्याची माहिती सराफांना द्यावी, असे रोकडे यांनी स्पष्ट केले.मागणीप्रमाणे हॉलमार्किंग वेळेत शक्य नाहीहॉलमार्क दागिन्यांची तपासणी आणि प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी बीआयएसची आहे. अशावेळी आम्ही हॉलमार्क केलेले दागिने तंतोतंत कॅरेटचे आहेत आणि प्रमाणित आहेत, असे बीआयएसने ग्राहकांना ठोसपणे सांगावे. हॉलमार्क अचूक नसेल तर ग्राहक सराफांना जबाबदार धरणार आहे. त्यामुळे सराफांचे ग्राहकांसोबत असलेले संबंध बिघडण्याची जास्त शक्यता आहे. दागिन्यांच्या मागणीप्रमाणे हॉलमार्किंग वेळेत होणे शक्य नसल्याने ग्राहकांच्या नाराजीसोबत व्यावसायिकांचे आर्थिक समीकरण बिघडण्याची भीती रोकडे यांनी व्यक्त केली.