प्रवाशांची गैरसोय : सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य, गडरलाईनच्या झाकणातून येते घाण पाणीनागपूर : गणेशपेठच्या मध्यवर्ती बसस्थानकावर घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांना मोठा मनस्ताप होत आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग गोळा झाले आहेत. परिसरात गडरलाईनच्या झाकणातून घाण पाणी बाहेर येत असल्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर उभे राहणेही कठीण होत आहे.गणेशपेठच्या मध्यवर्ती बसस्थानकावरील असुविधांचा ‘लोकमत’चमूने आढावा घेतला असता बसस्थानकावर अनेक त्रुटी आढळल्या. जागोजागी कचरा, अस्वच्छता आढळल्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासही जागा नसल्याचे चित्र दृष्टीस पडले. बसस्थानकावरून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी बसस्थानक परिसराच्या स्वच्छतेचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी)बसस्थानक परिसरातच कचऱ्याचा ढीगबसस्थानकावरील कचरा गोळा करून तो डम्पिंग यार्डमध्ये टाकण्याची गरज आहे. परंतु बसस्थानकाच्या सफाईचे कंत्राट दिलेला कंत्राटदार चंदू चव्हाणतर्फे बसस्थानकावर बसगाड्या आत जाण्यासाठी असलेल्या आगाराच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारीच हा कचरा टाकतो. त्यामुळे येथे कचऱ्याचा मोठा ढीग तयार झाला आहे. जोराची हवा आल्यास हा कचरा पुन्हा बसस्थानक परिसरात पसरत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.मोकाट कुत्र्यांचा उपद्रवगणेशपेठ बसस्थानक परिसरात अनेक मोकाट कुत्रे फिरत असल्याचे दृष्टीस पडले. एखाद्या प्रसंगी या मोकाट कुत्र्यांनी प्रवाशांना चावा घेतल्यास त्यांना रॅबीज सारख्या आजाराचा धोका होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे एसटी महामंडळाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.गडरलाईनमधून येते घाण पाणीबसस्थानकावर गाड्या बाहेर पडण्यासाठी असलेल्या गेटच्या मार्गावर एका गडरलाईनच्या झाकणातून घाण पाणी बाहेर येत आहे. मागील अनेक दिवसांपासून ही समस्या कायम आहे. परंतु हे घाण पाणी बाहेर येऊ नये यासाठी महामंडळाने कोणतीही व्यवस्था केलेली नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
बसस्थानक कधी होणार स्मार्ट ?
By admin | Published: September 22, 2016 3:08 AM