शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

नागपुरातील सिमेंट रस्ते ५० वर्षे टिकतील का ? वर्षभरातच भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 9:28 PM

गेल्या सहा वर्षांपासून शहरात सिमेंट रस्ते बांधले जात आहेत. हे रस्ते पुढील ५० वर्षे टिकतील, असा दावा करण्यात आला होता. मात्र, धड वर्षभरही हे रस्ते टिकलेले नाहीत. सिमेंट रस्त्यांना भेगा पडू लागल्या आहेत.

ठळक मुद्देगुणवत्तेवर प्रश्नचिन्ह :  कामही अर्धवट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डांबरी रस्ते वारंवार उखडतात. त्यावर खड्डे पडतात. यापासून होणाऱ्या त्रासापासून नागपूरकरांची मुक्तता करण्यासाठी दीर्घकाळ टिकणाऱ्या सिमेंट रस्त्याचे जाळे शहरभर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या सहा वर्षांपासून शहरात सिमेंट रस्ते बांधले जात आहेत. हे रस्ते पुढील ५० वर्षे टिकतील, असा दावा करण्यात आला होता. मात्र, धड वर्षभरही हे रस्ते टिकलेले नाहीत. सिमेंट रस्त्यांना भेगा पडू लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर पहिल्या टप्प्यातील फक्त ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील २५ ते ३० टक्के काम झाले आहे. यामुळे सिमेंट रस्ते प्रकल्पावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.सिमेंट रस्त्याच्या गुणवत्तेकडे कमालीचे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळेच सिमेंट रस्त्यांना भेगा पडू लागल्या आहेत. पहिल्या टप्प्यात जगनाडे चौक ते अशोक चौकादरम्यान तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या आहेत. या भेगा स्पष्टपणे दिसत आहेत. या मार्गावर बांधलेल्या सिमेंट रस्त्याची जाडी २० सेंटिमीटर आहे. तज्ज्ञांच्या मते ही जाडी किमान २५ ते ३० सेंटिमीटर असावी. या मार्गावर व्हाईट टॉपिंग चा उपयोग करण्यात आला आहे. या सिमेंट रोडच्या समांतर नागनदी वाहते. सिवरेज लाईन व जलवाहिनी देखील आहे. त्यामुळे या मार्गावर अधिकच भेगा पडलेल्या आहेत. या रस्त्याचे काम सुरू झाले त्यावेळी व्हीएनआयटीकडून रस्त्याचे डिझाईन व तयार करण्याच्या पद्धतीबाबत मंजुरी घेण्यात आली होती. मात्र, हे सर्व फेल ठरले. यापासून धडा घेत रेशीमबाग ते अशोक चौकापर्यंतच्या रस्त्याची जाडी २२ ते २५ सेंटिमीटर करण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्ते तयार करताना त्याची जाडी व डिझाईन याची विशेष काळजी घेतली गेली. यानंतरही काही रस्त्यांना भेगा पडल्या आहेत.मानेवाडा, अयोध्यानगर, सक्करदरा, छोटा ताजबाग रोड, तुकडोजी चौक आदी भागातील सिमेंट रस्त्यांवर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.रुरकीच्या तज्ज्ञांनी केली पाहणी सिमेंट रस्त्याला एवढ्या लवकर भेगा पडल्यामुळे महापालिका प्रशासनही चिंतेत आहे. यामुळेच महापालिकेने सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट (सीआरआरआय) रुरकीच्या तज्ज्ञांना पाहणी करण्याची विनंती सहा महिन्यांपूर्वी केली होती. दौऱ्यासाठी सहा लाख रुपये देखील जमा केले होते. महिनाभरापूर्वी सीआरआरआयच्या चमूने संबंधित मार्गाचे निरीक्षण केले. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. दुसऱ्या टप्प्यात गुणवत्ता नियंत्रणासाठी जियोटेक कंपनीला जवाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसत नाही. कामाची गतीही वाढलेली नाही.नव्या रस्त्यांवर ग्रीड झाले लहान मुख्य सिमेंट रस्त्यांना भेगा पडू नये म्हणून ३.२५ बाय ३.७५ मीटरचे ग्रीड (बॉक्स) तयार करण्यात आले आहेत. मात्र, बऱ्याच ठिकाणी हा फॉर्म्युला देखील यशस्वी ठरला नाही. त्यामुळे आता नव्या मार्गांवर ग्रीडचा आकार २ मीटरहूनही कमी करण्यात आला आहे. टाटा पारसी शाळेसमोरील सिमेंट रोडवर हे पाहायला मिळते. जुन्या मार्गांवर मात्र ४.५० मीटरपर्यंत कटिंग करण्यात आली होती. नव्या तंत्रज्ञानामुळे सिमेंट रोडच्या ग्रीडचा आकार १.२५ मीटर बाय १.२५ मीटर निस्चित करण्यात आला आहे. यामुळे भेगा पडल्या तरी त्या वाढत नाहीत.भेगा पडलेल्या रस्त्यांचे बिल रोखले : बनगिनवार महापालिकेचे मुख्य अभियंता विजय बनगिनवार यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यामध्ये जगनाडे चौक ते रेशीमबाग दरम्यान मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामातही काही ठिकाणी तशाच तक्रारी आहेत. याची गंभीर दखल घेत भेगा पडलेल्या रस्त्यांचे बिल रोखण्यात आले आहे. संबंधित कंत्राटदारालाच या रस्त्यांची पुढील पाच वर्षे देखभाल दुरुस्ती करायची आहे. त्यांनाच या भेगा दुरुस्त कराव्या लागतील. पावसाळ्यापूर्वी या भेगांची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी हे प्रमाण दोन टक्क्यांहून कमी होते. दुसऱ्या टप्प्यात तर भेगा पडण्याचे प्रमाण एक टक्क्यांहूनही कमी असल्याचा दावा त्यांनी केला. पडलेल्या भेगांची मॅपिंग करण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील आठवड्यात बैठक घेऊन याचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.सिमेंट रोडची स्थिती  : पहिला टप्पा पहिल्या टप्प्यात २५.७७५ किमीच्या ३० सिमेंट रोडसाठी ६ जून २०११ रोजी वर्कआर्डर देण्यात आल्या होत्या. त्यावेळी १०१.१८ कोटी खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. २४ महिन्यात संबंधित काम पूर्ण करायचे होते. यूनिटी इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेडला काम देण्यात आले होते. जानेवारी २०१८ पर्यंत ९.९४८ किमीचे काम पूर्ण झाले आहे. ४.१०२ किमी लांबीच्या रस्त्याचे काम सुरू आहे. आठ सिमेंट रस्त्यांचे काम अद्याप सुरू झालेले नाही.दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्यात ५५.४२ किमी सिमेंट रस्त्यासाठी २७९ कोटी रुपयांचा वर्कआर्डर काढण्यात आला. सरकार तर्फे ८ जानेवारी २०१६ रोजी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.नासुप्र व राज्य सरकारतर्फे संबंधित प्रकल्पासाठी १००-१०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. उर्वरित रक्कम महापालिकेला खर्च करायची आहे. सिमेंट रस्त्याचे २२ पॅकेज तयार करून वेगवेगळ्या कंत्राटदारांना काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. सद्यस्थितीत ३३ रस्त्यांचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील ३० टक्के म्हणजेच सुमारे ९० कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले आहे.तिसऱ्या टप्प्यात अनियमितता तिसऱ्या टप्प्यातील ६ पॅकेजमध्ये ३०० कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते तयार करायचे आहेत. मात्र, निविदाकार न आल्याने संबंधित पॅकेजची दहा भागात विभागणी करण्यात आली. प्रत्येक पॅकेज २० ते २५ कोटींचे करण्यात आले. एका वर्षात सहा निविदा निघाल्या. पाचव्या वेळी दहापैकी पाच पॅकेजसाठी कंत्राटदारांनी उत्सुकता दाखविली. मात्र, निविदा भरणाऱ्या काही कंत्राटदारांना फक्त कागदी अनुभव असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या एका कंपनीकडून निविदेसाठी कागदपत्रे तयार करून घेण्यात आली. एक फूट रस्ता बनला नसतानाही तिला ८४ कोटी रुपये अदा करण्यात आले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर