शहरं
Join us  
Trending Stories
1
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
2
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
3
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
4
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
5
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
6
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
7
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
8
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
9
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
10
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
12
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
13
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
14
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
15
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
16
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
17
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
18
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
19
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
20
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 9:28 PM

भाजपा उमेदवारांची तिकिटं ठरविण्याच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी असलेल्या बावनकुळे यांच्या उमेदवारीचे काय, असा प्रश्न त्यांच्या कामठी मतदारसंघासह राज्यभर चर्चेत आहे.

कमलेश वानखेडे- नागपूरभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे यावेळी कामठी मतदारसंघातून लढणार की नाही याबाबतचा सस्पेंस अजूनही कायम आहे. मी तिकीट मागितले नाही. मी तिकीट मागणारही नाही. केंद्रीय निवडणूक समिती काय निर्णय घेईल हे मला माहीत नाही, असे बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. (Chandrashekhar Bawankule Latest Update)

२०१९ मध्ये कापले होते तिकीट

२०१९ मध्ये युती सरकारमध्ये ऊर्जा मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांचे ऐनवेळी तिकीट कापण्यात आले होते. त्यानंतरही बावनकुळे यांनी पक्षाचे काम केले. संयमाचे याचे फळ त्यांना मिळाले व विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली.

कामठीतून कोण लढणार?

त्यानंतर ते पक्षाचे प्रदेशाध्यक्षही झाले. इतर उमेदवारांचे तिकीट ठरविण्याच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी असलेल्या बावनकुळे यांच्या उमेदवारीचे काय, असा प्रश्न त्यांच्या कामठी मतदारसंघासह राज्यभर चर्चेत आहे. ते लढले नाही, तर उमेदवार कोण असणार, याबद्दलचीही चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत बावनकुळे यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, मी पाच वर्षांपूर्वी १५ वर्षे कामठी मतदारसंघाचा आमदार होतो. गेल्यावेळी मी लढणार होतो. पण मला पक्षाचे काम करण्याचे सांगण्यात आले."

"आता मी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करीत आहे. पक्षाला मी तिकीट मागितले नाही. पक्षाला काय वाटते ते माहीत नाही. पण कामठी मतदारसंघात कुणीही उमेदवार दिला तरी भाजपच जिंकेल", असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kamthi-acकामठीChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा