शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

कोरोनाचा धोका वाढल्यावरच सिरो सर्वेक्षण करणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2021 7:00 AM

Nagpur News नागपूर शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात अ‍ॅंटिबॉडी निर्माण झाल्याचे समोर आले होते. यामुळे दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त कार्यालय कधी घेणार पुढाकार?

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे नियोजन केले जात असताना दुसऱ्या लाटेनंतर किती टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडी निर्माण झाल्याचे सर्वेक्षण होणे गरजेचे होते. परंतु दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत सर्वेक्षणाचे नियोजन झाले नाही. यामुळे कोरोनाचा धोका वाढल्यावरच सिरो सर्वेक्षण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या सिरो सर्वेक्षणात ५८ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज निर्माण झाल्याचे आढळून आले. नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या लहान मुलांमधील कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीत २ ते १८ वयोगटातील १०० मुलांमधून १८ मुलांच्या (१८ टक्के ) शरीरात प्रतिपिंडाची (ॲंटिबॉडी) निर्मिती झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, नोव्हेंबर २०२० मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) ‘पीएसएम’ विभागाच्या सहकार्याने सिरो सर्वेक्षण करण्यात आले. यात शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात अ‍ॅंटिबॉडी निर्माण झाल्याचे समोर आले होते. विशेषत: झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये ॲंटिबॉडीज तयार होण्याचे प्रमाण सामान्य व उच्चभ्रू वसाहती राहणाऱ्या लोकांपेक्षा तिप्पट होते. यामुळे दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हानिहाय डेटा तयार करण्याच्या सूचना

आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्यांना आरोग्य भारतीय वैद्यक संशोधन परिषदेबरोबर (आयसीएमआर) विचारविनिमय करून आपापल्या राज्यात सिरो सर्वेक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. अशा सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय डेटा तयार करण्याचाही यात सूचना आहेत.

सर्वेक्षणाची गरज का?

तज्ज्ञानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये नागपूरचा समावेश आहे. जानेवारी ते मे या कालावधीत नागपूर जिल्ह्यात तीन लाख ५० हजार ८३८ रुग्ण, तर चार हजार ९७२ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली. यामुळे किती टक्के नागपूरकरांमध्ये ॲंटिबॉडीज निर्माण झाल्या याचे सिरो सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षणामुळे सार्वजनिक आरोग्यासंबंधी उपाययोजना निश्चित करण्यासाठी मदत होईल. कोरोनाचे नियोजन करताना या बाबी मार्गदर्शक ठरतील.

 

-एप्रिल महिन्यात होणार होते दुसरे सर्वेक्षण

तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी एप्रिल महिन्यात दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाची तयारी करण्याचा सूचना मेडिकलच्या ‘पीएसएम’ विभागाला दिल्या होत्या. परंतु कोरोनाची दुसरी लाट याच दरम्यान तीव्र होती. यामुळे सर्वेक्षण पुढे ढकलण्यात आले. नंतर त्यांची बदली झाल्याने सर्वेक्षणाबाबत कुठल्याही सूचना मेडिकलला मिळाल्या नाहीत. आता रुग्णांची संख्या कमी असल्याने सर्वेक्षण करून किती लोकांमध्ये अ‍ॅंटिबॉडीज वाढल्याचा अंदाज घेणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

-सिरो सर्वेक्षणाबाबत लवकरच निर्णय

दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाबाबत तूर्तास तरी कुठलाही निर्णय झाला नाही. परंतु बैठकीमध्ये यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

- योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस