शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

संसर्ग वाढणार की थांबणार?

By admin | Published: July 05, 2017 1:52 AM

रुग्णालयातील कचऱ्याचे योग्य नियोजन न झाल्यास तो घातक ठरू शकतो. परंतु मेडिकलला याचा विसर पडल्याचे चित्र आहे.

मेडिकल : महिलांच्या वॉर्डासमोर कचऱ्याचा ढीगलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णालयातील कचऱ्याचे योग्य नियोजन न झाल्यास तो घातक ठरू शकतो. परंतु मेडिकलला याचा विसर पडल्याचे चित्र आहे. संसर्गजन्य वॉर्डाच्या समोरच कचऱ्याचा ढीग लावून सफाई कर्मचारी मोकळे होतात. विशेष म्हणजे, या कचऱ्याची उचलही नियमित होत नाही. यामुळे पावसामुळे तो कुजून परिसरात दुर्गंधी पसरल्याने रुग्णाचा संसर्ग वाढणार की थांबणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.‘स्वाईन फ्लू’सह इतर संक्रमणाचे आजार वाढल्याने शासकीय स्तरावर उपचार मिळावे म्हणून मेडिकलमध्ये ‘संक्रमण आजार नियंत्रण विभागा’चे (संसर्गजन्य वॉर्ड) बांधकाम करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीमधून झालेल्या या बांधकामावर १ कोटी ९१ लाखांचा निधी खर्च झाला. तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हा वॉर्ड एप्रिल २०१७ रोजी मेडिकलकडे हस्तांतरित केला. येथे स्वाईन फ्लूच्या रुग्णासोबतच वॉर्ड क्र. ३७ व ३८ मध्ये भरती करण्यात येणारे संसर्गजन्य रुग्ण या वॉर्डात ठेवले जाणार होते. परंतु अर्धवट बांधकाम व ‘सेंट्रललाईज्ड आॅक्सिजन लाईन’सह इतरही सोई या वॉर्डात उपलब्ध झाल्या नाहीत. यामुळे तूर्तास याला वॉर्ड क्र. ४९ असे नाव देऊन औषधवैद्यकशास्त्र विभागातील महिला रुग्णांना भरती करून घेण्यात येत आहे. मुख्य रुग्णालयाच्या इमारतीपासून हा वॉर्ड दूर असल्याने डॉक्टरांसह रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शिवाय, कचऱ्याच्या दुर्गंधीचा मोठा सामना करावा लागत असल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत.बायोमेडिकल वेस्टच्या जागी रुग्णालयाचा कचरावॉर्ड क्र. ४९ समोर पूर्वी रुग्णांवर उपचार केल्यानंतर निघणारा घातक जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) उघड्यावर टाकला जात होता, ‘लोकमत’ने हा धक्कादायक प्रकार सामोर आणताच स्वत: प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची गंभीर दखल घेत मेडिकलला नोटीस दिली होती. त्यामुळे बायोमेडिकल वेस्टचे योग्य नियोजन होऊ लागले आहे, परंतु आता त्या जागेवर रुग्णालयातील कचरा टाकला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यात जैविक कचऱ्याचाही समावेशरुग्णालयातील वॉर्डा-वॉर्डात रुग्णाने वापरलेल्या कापसाच्या बोळ्यापासून इतरही कचरा काळ्या रंगाच्या पिशवीत भरून सर्रास वॉर्ड क्र. ४९ समोर टाकला जातो. हा कचरा उचलण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु त्यांच्याकडून कचऱ्याची उचल नियमित होत नसल्याची माहिती आहे.