शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

‘मुद्रा’ योजनेच्या आकड्यांचा सरकारकडूनच खेळखंडोबा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 10:15 AM

मुद्रा बँक योजनेंतर्गत वर्षभरात ऋणखात्यांची संख्या व वाटप झालेल्या ऋणासंदर्भात वेगवेगळी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर आकडेवारीचा खेळ झाला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देएकाच वर्षाच्या ऋणखात्यांबाबत वेगळी आकडेवारी ऋणखात्यांचा नेमक्या संख्येबाबत प्रश्नचिन्ह

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील असंघटित लघु उद्योगांच्या विकासाकरिता वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने मुद्रा बँक योजनेची सुरुवात केली. परंतु बराच गाजावाजा करून सुरू झालेल्या या योजनेबाबत आता सरकारकडूनच विसंगत माहिती देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वर्षभरात ऋणखात्यांची संख्या व वाटप झालेल्या ऋणासंदर्भात वेगवेगळी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर आकडेवारीचा खेळ झाला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘मायक्रो युनिट्स डेव्हलमेंट अ‍ॅन्ड रिफायनान्स एजंसी लिमिटेड’कडून एकाच विषयाशी संबंधित दोन माहिती अधिकारांमध्ये वेगवेगळी माहिती देण्यात आल्याने, ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडे विचारणा केली होती. २०१८-१९ या कालावधीत किती लाभार्थ्यांना मुद्रा योजनेंतर्गत किती कर्ज खाती उघडण्यात आली, वितरित कर्जाचा आकडा किती होता तसेच किती रक्कम ‘एनपीए’मध्ये आली आहे, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते.‘मुद्रा’तर्फे १९ आॅगस्ट २०१९ रोजी प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये १ कोटी ४४ लाख ५५ हजार ७१२ ‘मुद्रा’ ऋण खाती उघडण्यात आली व ६९,८९४.०८ कोटींचे ऋण वितरित करण्यात आले.परंतु ‘मुद्रा’तर्फे ११ मार्च २०१९ रोजीदेखील एका माहितीच्या अधिकारांतर्गत एप्रिल २०१८ ते डिसेंबर २०१८ या आठ महिन्यांच्या कालावधीतील आकडेवारी देण्यात आली होती. यानुसार त्या आठ महिन्यांत ऋणांची संख्या ३ कोटी ६ लाख १४ हजार १२८ इतकी होती व ऋणखातेधारकांना १,५४,९१८.५९ कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले.वरील आकडेवारीनुसार एकूण ऋणखाती तसेच वाटप करण्यात आलेल्या ऋणनिधीची वर्षभराची आकडेवारी ही आठ महिन्यांच्या आकड्यांपेक्षा कमी दिसून येत आहे. वाटप केलेल्या कर्जाचा आकडादेखील कसा काय घटला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘एनपीए’चा आकडा १७ हजार कोटींहून अधिकदरम्यान, २०१५ पासून अनेक कर्जदारांनी मिळालेल्या कर्जाची परतफेड करण्यास टाळाटाळ केली आहे. बँकांकडून वारंवार पाठपुरावा करूनही त्यास दाद न दिल्याने ही कर्जखाती 'एनपीए' करण्यात आली आहे. ३१ मार्च २०१९ अखेर या योजनेअंतर्गत ‘एनपीए’ खात्यांची संख्या ही ३६ लाख ९६ हजार १९ इतकी होती व ‘एनपीए’ची रक्कम ही १७ हजार ७१२ कोटी ६३ लाख इतकी होती.

काय आहे ‘मुद्रा’ योजना ?भारतीय रोजगार क्षेत्रात मोठ्या संख्येने सामावून घेतलेल्या लघुउद्योगांना आर्थिक साहाय्य पुरविणे हा मुद्रा कर्ज योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण अशा तीन टप्प्यांत कर्ज दिले जाते. शिशू योजनेंतर्गत ५० हजार, किशोर योजनेंतर्गत पाच लाख तर तरुण योजनेंतर्गत उद्योजकांना १० लाखांपर्यंतचे कर्ज मिळते.

टॅग्स :Governmentसरकार