शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा केंद्रात मंत्री, अतिरिक्त खाते मिळणार का ?

By योगेश पांडे | Published: June 09, 2024 10:48 PM

२०१४ साली मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरच नितीन गडकरी यांनी देशभरात कामाचा धडाका लावला होता. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गांचे रुप पालटले व देशात लाखो किलोमीटर लांबीच्या महामार्गांच्या कामाला सुरुवात झाली.

योगेश पांडे नागपूर : रविवारी झालेल्या शपथग्रहण सोहळ्यात नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. २०१४ पासून भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा व गंगा पुनरुत्थान मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी आपल्या कार्यशैलीने विरोधकांनादेखील प्रभावित केले होते. आता परत मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत असताना देशासह विदर्भाच्या विकासाला नवा ‘बूस्टर डोज’ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

२०१४ साली मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरच नितीन गडकरी यांनी देशभरात कामाचा धडाका लावला होता. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गांचे रुप पालटले व देशात लाखो किलोमीटर लांबीच्या महामार्गांच्या कामाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे ईशान्येकडील राज्यांमधील महामार्गांचे जाळे विस्तारले. दुसरीकडे गडकरी यांच्या प्रयत्नांतून देशातील जलवाहतुकीलादेखील नवीन संजीवनी मिळाली होती. अनेक वर्ष अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया हा १ हजार ३९० किलोमीटर लांबीचा जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरला. शिवाय वाराणसी येथे मल्टीमॉडेल हब स्थापन करुन एक इतिहासच रचला. गंगा नदीच्या स्वच्छतेलादेखील गती आली होती. त्यानंतर गडकरी यांच्याकडे केवळ भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयच ठेवण्यत आले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममध्ये गडकरी यांच्याकडे कुठले मंत्रालय येणार याबाबत नागपुरकरांना उत्सुकता आहे.

महाराष्ट्र-विदर्भाला मोठ्या आशा

दिल्लीत काम करत असताना गडकरी यांनी महाराष्ट्र व विदर्भाकडे नेहमीच लक्ष ठेवले. यांच्या पुढाकारातून राज्यात प्रत्यक्षात हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे काम झालेदेखील आहे. राज्यातील रस्त्यांचे जाळे आणखी मजबूत व्हावे यासाठी गडकरींनी आणखी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नागपुरात रोजगारनिर्मिती वाढावी

गडकरी प्रतिनिधित्व करत असलेल्या नागपुरचा मागील दहा वर्षांत बराच कायापालट झाला. ‘मेट्रो’ सुरू झाली. शिवाय ‘आयआयएम’, ‘एम्स’ यासारख्या राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक संस्थादेखील सुरू झाल्या. मोठ्या आयटी कंपन्यांचेदेखील काम सुरू झाले असून शहरात रोजगारवाढीसाठी उद्योग येण्यासंदर्भात गडकरींनी पावले उचलावी अशी अपेक्षा नागपुरकर व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी