नागपूर : राज्य शासनाने कविवर्य राजा बढे यांचे 'जय जय महाराष्ट्र्र माझा... गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताला महाराष्ट्र राज्य गीताचा दर्जा दिलेला आहे. त्यासाठी शैक्षणिक, सांस्कृतीक, सामाजिक क्रीडा विषयक, शासकीय, गैरशासकीय कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीतानंतर राज्य गीताला सुद्धा मानाचं स्थान देण्यात यावं असे निर्देश सरकारने दिले आहे.
परंतु दुर्दैवाने शाळा, महाविद्यालय, चित्रपट गृह, सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रमाच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये राज्यगीताचा समावेश होतांना दिसत नाही. यामुळे राज्यगीताचा होणारा अपमान आम्हां महाराष्ट्र सैनिकांना तसेच महाराष्ट्र प्रेमींना सहन होणारा नाही अशी भावना निवेदनाद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूरचे शहर अध्यक्ष विशाल बडगे यांचा नेतृत्वात देण्यात आले. याप्रसंगी उमेश बोरकर, घनश्याम निखाडे, महेश जोशी, शशांक गिरडे, गौरव पुरी, सुमित वानखेडे, प्रशांत निकम, अंकित झाडे, उमेश उतखेडे, अण्णा गजभिये, मोहीत देसाई आदी उपस्थित होते.