लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक विजयादशमी सोहळ्यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मंगळवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘एचसीएल’चे संस्थापक व अध्यक्ष शिव नाडर हे उपस्थित राहणार आहेत.सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. अर्थव्यवस्थेतील मंदी, राममंदिर, राजकारण, देशाची सुरक्षा इत्यादी मुद्यांवरून राजकारण तापले असताना सरसंघचालक एकूण परिस्थितीबाबत काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान यंदाचा विजयादशमी सोहळा ‘हायटेक’ करण्याचा संघाचे प्रयत्न आहेत. काही दिवसांतच महाराष्ट्र व हरियाणा या राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. मे २०१९ मध्ये केंद्राला जनतेने परत पसंती दिली. अशास्थितीत केंद्राचे आर्थिक धोरण, केंद्र शासनाची कामगिरी, सामाजिक समरसता, सीमा क्षेत्रातील स्थिती, दुर्गम क्षेत्रांचे मागासलेपण, संघ-शासन-समाजाचा समन्वय इत्यादींसंदर्भात डॉ. भागवत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र तसेच राज्यातील मंत्रीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.‘ ट्विटर ’, ‘फेसबुक’, ‘रेडिओ’वर ‘लाईव्ह’देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारची परत वापसी झाल्यानंतरचा हा पहिलाच विजयादशमी उत्सव आहे. शाखांची वाढलेली संख्या, संघाचा वाढता दबदबा यामुळे यंदादेखील यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जास्तीत जास्त नागरिक यावेळी सहभागी व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या सोहळ्याचे ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार आहे. सोबतच प्रथमच ‘फेसबुक’सह, ट्विटर, यूट्यूब या माध्यमातूनदेखील संघाचा कार्यक्रम जगभरात ‘लाईव्ह’ होणार आहे.
सरसंघचालक देणार केंद्राला अर्थव्यवस्थेवर बौद्धिक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 11:43 PM
अर्थव्यवस्थेतील मंदी, राममंदिर, राजकारण, देशाची सुरक्षा इत्यादी मुद्यांवरून राजकारण तापले असताना सरसंघचालक एकूण परिस्थितीबाबत काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ठळक मुद्देसंघाचा विजयादशमी उत्सव आज : ‘हायटेक’ राहणार सोहळा