लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कल्याणकारी महामंडळ स्थापन झाल्यास ऑटोरिक्षा चालकाला सुरक्षा कवच मिळेल. परंतु गेल्या चार वर्षांपासून याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मुख्य मागणीसाठी विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन पुन्हा एकदा आंदोलन उभे करेल, असे प्रतिपादन फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांनी येथे व्यक्त केले.विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचा १४ वा वर्धापन दिन सोहळा आमदार निवास, सिव्हिल लाईन्स येथे पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मंचावर विमा कंपनीचे दुबे, फेडरेशनचे उपाध्यक्ष मोक्षवीर लोहकरे, इलियास खान, रवी तेलरांधे, बाबा बागवाले, नरेंद्र वाघमारे, ज्ञानेश्वर हुमणे, राजू इंगळे, विष्णू तिवारी, प्रिन्स इंगोले, आशिष माणिके, आनंद चौरे व टायगर ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष जावेद शेख यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते. भालेकर म्हणाले, अवैध वाहतूक आजही सुरू आहे. कल्याणकारी मंडळाची घोषणा करूनही अंमलबजावणी होत नाही आहे. मुक्तहस्ते ऑटो परवान्यांचे वितरण करून ऑटोचालकांचा व्यवसाय डबघाईस आणला आहे. यामुळे ऑटोचालकांनी एकजूट होऊन आपली ताकद दाखविण्याची आता गरज आहे, असेही ते म्हणाले.यावेळी रवी सुखदेवे, प्रकाश साखरे, किशोर बांबोले, आसिफ सत्तार, किशोर इलमकर, जवाहर पटले, किशोर सोमकुंवर, आनंद मानकर, आमोद आष्टनकर, सलीम शेख, महादेव खोडे, देविदास महल्ले या पदाधिकारींनी सामूहिकपणे स्वागत केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत भालेकर यांनी केले. संचालन चौरे यांनी केले तर, आभार तेलरांधे यांनी मानले. कार्यक्रमाला विदर्भाच्या प्रत्येक जिल्हा, तालुक्यातून कार्यकर्ते आले होते.
कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी लढा उभारणार : विलास भालेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 10:21 PM
कल्याणकारी महामंडळ स्थापन झाल्यास ऑटोरिक्षा चालकाला सुरक्षा कवच मिळेल. परंतु गेल्या चार वर्षांपासून याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मुख्य मागणीसाठी विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन पुन्हा एकदा आंदोलन उभे करेल, असे प्रतिपादन फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांनी येथे व्यक्त केले.
ठळक मुद्देविदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचा वर्धापन दिन साजरा