शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पोलीस पाटलांचे प्रलंबित प्रश्न सोडविणार

By admin | Published: February 21, 2016 2:54 AM

राज्यातील गावागावांमध्ये पोलीस पाटील हे राज्य शासन व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून काम करीत असतात. निष्ठेने सेवा करीत असूनदेखील गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : पोलीस पाटलांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटननागपूर : राज्यातील गावागावांमध्ये पोलीस पाटील हे राज्य शासन व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून काम करीत असतात. निष्ठेने सेवा करीत असूनदेखील गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शनिवारी रेशीमबाग मैदान येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या सहाव्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी मंचावर आ.सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार, भाजपाचे संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. पोलीस पाटलांबाबत गावागावांमध्ये विश्वासाचे वातावरण आहे. पोलीस दलाचा विस्तार होत असतानादेखील पोलीस पाटलांचे महत्त्व कायम आहे व गृहखात्याचे अविभाज्य अंग आहे, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पोलीस पाटलांच्या कामांचे कौतुक केले. गेल्या अनेक वर्षांमध्ये पोलीस पाटलांच्या प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यात आलेले नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्यांच्या मानधनवाढीचा आहे. मानधनासंदर्भात तत्काळ निर्णय झाला पाहिजे व त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शिवाय पोलीस पाटलांच्या नियुक्तीमध्ये मुलाखतीला बाद करण्यात येईल व केवळ गुणवत्तेच्या आधारावरच निवड करण्यात येईल. याशिवाय पोलीस पाटलांच्या वारसांना जागा मिळावी यासाठी नियमांत काही तरतूद करता येते का याचा आढावा घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. पोलीस पाटलांना निवृत्तीनंतर काहीच मिळत नाही. त्यांच्यासाठी विधायक योजना सुरू करण्याबाबत आपण स्वत: पुढाकार घेऊ, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.भिकाजी पाटील, नियोजित अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, उपाध्यक्ष भृंगराज परशूरामकर, भिकूजी पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते. श्रीकृष्ण पाटील यांनी आभार मानले. या अधिवेशनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पोलीस पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)वित्त विभागाला माणसांचा विचार नाहीपोलीस पाटलांच्या मानधनासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी वित्त विभागाच्या कारभारावर टिप्पणी केली. पोलीस विभागात पर्याप्त कर्मचारी असल्यामुळे पोलीस पाटलांचे मानधन वाढविण्याची आवश्यकता नाही, असा शेरा वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी दिला होता. वित्त विभागाचे काम पैसे वाचविणे हे आहेच. माणूस कोण आहे, काय आहे याचा विचार ते करतच नाहीत. वित्त विभागातच पोलीस पाटलांच्या मानधनाची फाईल अडकली होती. परंतु आता या प्रस्तावासंदर्भात मी व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आम्ही दोघेही जबाबदारी घेतो. वेळ पडली तर संबंधित अधिकाऱ्यांना समजेल अशाच भाषेत समजविण्याचीदेखील आमची तयारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.