शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

‘एल-निनाे’च्या प्रभावाने यंदा खरेच दुष्काळ पडेल?; भारतीय हवामान विभागाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 8:50 AM

एल-निनाेचा प्रभाव असताे; पण भारतात पावसाळी हंगामावर ‘इंडियन ओशन डायपाेल’ (आयओडी) चादेखील प्रभाव असताे

निशांत वानखेडे नागपूर : गेल्या वर्षी ‘ला-निना’च्या प्रभावाने भारतात पावसाचे प्रमाण वाढले हाेते. यावर्षी मात्र पावसाळी हंगामावर ‘एल-निनाे’चे सावट घाेंगावत आहे. एल-निनाेच्या प्रभावाने ऑस्ट्रेलिया व आशियामध्ये मान्सूनचा पाऊस कमी हाेताे. त्यामुळे यंदा भारतात दुष्काळाची परिस्थिती निर्माण हाेईल काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान विभागाने एल-निनाेची सक्रियता मान्य केली असली तरी माैन ठेवत दुष्काळाची शक्यता नाकारली आहे. 

यापूर्वी कधी जाणवला परिणाम?  साधारणात: एल-निनाे ३ ते ६ वर्षांनी येताे. यापूर्वी २०१८ साली एल-निनाेचा प्रभाव हाेता व त्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला. भारतात २००४, २००९, २०१४ व २०१८ म्हणजेच ५, ५, ४ वर्षांच्या अंतराने तो अवतरला आहे. 

एल-निनाेचा प्रभाव असताे; पण भारतात पावसाळी हंगामावर ‘इंडियन ओशन डायपाेल’ (आयओडी) चादेखील प्रभाव असताे. ताे त्यावेळच्या अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील पाण्याच्या तापमानातील फरकावर अवलंबून असताे. त्यामुळे एल-निनाेच्या परिणामाचा निष्कर्ष निराधार आहे. देशात पावसाळ्याच्या स्थितीवर शिक्कामाेर्तब करण्यास अद्याप दोन महिन्यांचे निरीक्षण बाकी आहे. - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान तज्ज्ञ