जनतेच्या खिशातून पैसे वसूल करणार का?, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
By मंगेश व्यवहारे | Updated: December 21, 2024 12:22 IST2024-12-21T12:22:23+5:302024-12-21T12:22:56+5:30
राज्यातील आर्थिक स्त्रोत वाढविण्यासाठी सरकार सामान्य जनतेच्या खिशातून पैसे वसूल करणार आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना उपस्थित केला.

जनतेच्या खिशातून पैसे वसूल करणार का?, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
नागपूर - राज्यातील आर्थिक स्त्रोत वाढविण्यासाठी सरकार सामान्य जनतेच्या खिशातून पैसे वसूल करणार आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना उपस्थित केला.
राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे, याकडे नाना पटोले यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले,‘सरकार पूर्णत: कर्जबाजारी झाले आहे. महागाई वाढवून, जनतेच्या खिशातून पैसे काढून राज्याचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे का, याचे उत्तर सरकारने द्यावे. आम्ही अडीच वर्षांच्या कार्यकाळात आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने अनेक जमेच्या बाजू निर्माण केल्या होत्या. मात्र, या सरकारने राज्याला कर्जाच्या खाईत लोटले आहे.’ खातेवाटपावर बोलताना त्यांनी आज ४१ मंत्री बिनखात्याचे आहेत. त्याचा उपयोग काय, असा सवाल केला.