शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

ट्रेन जाणार की रद्द ?.. प्रवाशांना कळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 1:49 AM

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसला झालेला अपघात व मुंबईतील मुसळधार पाऊस यामुळे रेल्वे सेवा प्रभावित झाली व त्याचा फटका प्रवाशांना बुधवारीही सहन करावा लागला.

ठळक मुद्देरद्द ट्रेनची माहिती घेताना दमछाक : वेटिंग रुममध्ये घालवले तासन्तास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसला झालेला अपघात व मुंबईतील मुसळधार पाऊस यामुळे रेल्वे सेवा प्रभावित झाली व त्याचा फटका प्रवाशांना बुधवारीही सहन करावा लागला. नागपूर स्टेशनवर रद्द झालेल्या गाड्यांची माहिती घेताना प्रवाशांची दमछाक झाली. कधी गाडी येणार असल्याचे सांगण्यात आले तर कधी काही वेळातच संबंधित गाडी रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे प्रवाशांची एकच धावपळ उडाली व प्रचंड गैरसोय झाली.रेल्वे प्रशासनातर्फे फ्लॅटफॉर्म क्रमांक १ वर विशेष चौकशी बूथ लावण्यात आले होते. येथे फलकावर रद्द झालेल्या व विलंबाने धावत असलेल्या गाड्यांची माहिती लिहिली जात होती. मात्र, फलकावर लिहिली जात असलेली माहिती व प्रत्यक्षात माईकवरून होत असलेल्या घोषणेत फरक असल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली.उपस्टेशन व्यवस्थापक (वाणिज्य) कार्यालयात चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे प्रवाशांचा संभ्रम वाढला होता.दरम्यान, बुधवारी नागपूर -मुंबई दुरंतो एक्स्प्रेस, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेससह अन्य काही गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बºयाच प्रवाशांना स्टेशनवरून परतावे लागले. ज्यांना अत्यावश्यक काम होते त्यांना बस व ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागला. अव्यवस्था एवढी होती की सायंकाळी ५.१० वाजता सुटणारी विदर्भ एक्स्प्रेस रद्द झाली की नाही याची माहिती दुपारी २ पर्यंत प्रवाशांना मिळालेली नव्हती. त्यामुळे तिकीट रद्द करावे की कायम ठेवावे, असा प्रश्न प्रवाशांना पडला होता. काही प्रवासी तर वेटिंग रुममध्ये तासन्तास गाड्यांची वाट पाहत बसले होते.ट्रेन रद्दची सूचना दिली : सिबलगोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस रद्द झाली आहे का, याची माहिती घेण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांची दुपारी संपर्क केला असता ते म्हणाले, दुपारी २.३० च्या सुमारास दपूमरे झोनकडून ट्रेन रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे. मध्य रेल्वे झोनकडून दपूमरे झोनला ही माहिती उशिरा मिळाल्यामुळे मंडळ प्रशासनाला याबाबत उशिरा माहिती झाले. यामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.ट्रेन रद्द करण्याचा निर्णय मुंबईहून : मिश्रामध्य रेल्वे, नागपूर मंडळाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक कुश किशोर मिश्रा म्हणाले, ट्रेन रद्द करण्याचा निर्णय झोन मुख्यालयातूनच (मुंबई) घेतला जातो. ट्रेन रद्द केल्याची माहिती मिळताच नागपूर स्टेशनवर विशेष बूथ लावून व लाऊड स्पीकरवरून घोषणा करून प्रवाशांना माहिती दिली जाते. ज्या प्रवाशांनी रिझर्व्हेशन फॉर्मवर आपले मोबाईल नंबर नोंदविले आहेत त्यांना मोबाईलवर ट्रेन रद्द झाल्याची माहिती दिली जात आहे.प्रवाशांची अशी झाली गैरसोयरेलयात्री आनंद सुखदेवे यांना मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये भरती आपल्या एका परिचित व्यक्तीला भेटण्यासाठी विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जायचे होते. त्यांनी स्लीपर क्लासचे तिकीट काढले होते. त्यांचा पीएनआर नंबर ६५०५४०२४४ होता. त्यांना फोनवर संबंधित गाडीची योग्य माहिती मिळत नव्हती. त्यामुळे ते स्टेशनवर पोहचले. तेव्हा त्यांना ट्रेन रद्द झाल्याचे कळले. त्यामुळे निराश होऊन घरी परतावे लागले. देवीदास गाडेकर यांना कार्यालयीन कामासाठी मुंबईला जायचे होते. त्यांनी नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसच्या स्लीपर क्लासचे तिकीट काढले होते. त्यांचा पीएनआर नंबर ८३६२८५४२२० होता. ट्रेन रद्द झाल्याची पूर्वसूचना त्यांना मोबाईलवर मिळालीच नाही. स्टेशनवर पोहचल्यावर रद्द झाल्याचे कळले. यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.