आॅनलाईन लोकमतनागपूर : सरते वर्ष २०१७ ला निरोप आणि २०१८ या नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी पार्ट्यांचे बेत आखले आहेत. पण मद्य बाळगण्याचा परवाना नसलेल्या पार्ट्या आयोजकांना महागात पडणार आहे. मद्य प्राशन करा, पण नियमांत, असा सल्ला उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.अवैध पार्ट्यांवर बारकाईने लक्षपार्टीत मद्याचा वापर होत असल्यास उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घेणे बंधनकारक आहे. परवाना नसलेल्या पार्ट्यांमध्ये मद्य आढळून आल्यास उत्पादन शुल्क विभाग कारवाई करणार आहे. त्यासाठी विभागाने आठ भरारी पथके तयार केली आहे. ही पथके अवैध पार्ट्यांवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. या पथकांमध्ये निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलचा समावेश आहे. त्यामुळे घराच्या छतावर नववर्ष कार्यक्रम साजरा करणे महागात पडणार आहे.विभागाकडून मद्य बाळगण्याचा परवाना दिला जातो. त्यात एक लिटरच्या १२ बॉटल ठेवण्याची परवानगी आहे. नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी आतापर्यंत ३२ अर्ज विभागाकडे प्राप्त झाले असून अद्याप एकाही अर्जदाराला मंजुरी दिलेली नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.बीअरबार पहाटे ५ पर्यंत सुरू राहणारउत्पादन शुल्क विभागाने ३१ डिसेंबरला मद्यविक्रीचे नियम शिथिल केले असून वाईन शॉप व बीअरशॉपी मध्यरात्री १ वाजेपर्यंत, बीअरबार, क्लब पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. नववर्षाचे स्वागत नियमात राहून करा, दारू पिण्यास मनाई नाही, मात्र कायद्याचे उल्लंघन करू नका, मद्य बाळगण्याचा परवाना ठेवावा, मद्य पिऊन गाडी चालवू नका, अशा सूचना विभागाने केल्या आहेत.
छतावरील पार्ट्यांसाठी मद्य परवाना बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:48 PM
आॅनलाईन लोकमतनागपूर : सरते वर्ष २०१७ ला निरोप आणि २०१८ या नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी पार्ट्यांचे बेत आखले आहेत. पण मद्य बाळगण्याचा परवाना नसलेल्या पार्ट्या आयोजकांना महागात पडणार आहे. मद्य प्राशन करा, पण नियमांत, असा सल्ला उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.अवैध पार्ट्यांवर बारकाईने लक्षपार्टीत मद्याचा वापर होत असल्यास उत्पादन शुल्क विभागाकडून ...
ठळक मुद्देउत्पादन शुल्क विभागाची भरारी पथके : नववर्ष समारंभ