लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूरला भरवण्याच्या निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि तो अमलात आणला. मात्र दरवर्षी नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत होणार आहे. १९ नोव्हेंबरपासून मुंबईत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भातील निर्णय झाला असून पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तो जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईत आमदारांच्या निवासस्थानाचे पाडकाम सुरू केले जाणार आहे. शिवाय मुंबईतील पावसामुळे अधिवेशनाच्या कामकाजावर परिणाम होतो, असे सांगून पावसाळी अधिवेशन विदर्भात घेण्याचा निर्णय झाला. मात्र आता विदर्भात दरवर्षी होणारे अधिवेशन मुंबईत घेतले जाणार आहे. नागपुरातील हॉटेल चालकांनाही तुम्ही तुमचे वेगळे बुकिंग घ्यायचे असेल तर घ्या, असे संदेशही गेल्याचे सांगण्यात येत आहे.
हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 1:35 AM
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूरला भरवण्याच्या निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि तो अमलात आणला. मात्र दरवर्षी नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत होणार आहे. १९ नोव्हेंबरपासून मुंबईत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भातील निर्णय झाला असून पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तो जाहीर ...
ठळक मुद्देपावसाळी अधिवेशन नागपूरला भरवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा