नागपूर : मीरा भाईंदर ते मुंबईला जोडणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे जे काम जमिनीच्या आरक्षणामुळे रखडले होते, त्याला आज हिवाळी अधिवेशनात हिरवी झेंडी मिळाली आहे. मुरडा, राई येथे मेट्रोचे कारशेड उभे होणार होते. परंतु तेथील गावकऱ्यांनी त्याला विरोध केला होता.
पुरवणी मागण्यांमध्ये हा विषय सभागृहात ठेवण्यात आला होता. आज मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात चर्चा केली आणि मेट्रोचे कारशेड उत्तन येथे महसूल खात्याच्या असलेल्या जमिनीवर निर्माण करण्यास हिरवी झेंडी दाखवली आहे.
त्यामुळे मेट्रोचा प्रकल्प जो तीन वर्षांपासून रखडला होता, त्याला आता गती येणार असल्याची शिंदेच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी सभागृहाबाहेर सांगितली.