सहा दिवसापासून नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनचा सातवा दिवस झाला. आज महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर सभागृहात ठराव संमत करण्यात आला. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भाषणात सरकारवर टीका केली, यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना टोला लगावला.
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले, पण तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अनेक नेते मंत्रीपदाची वाट पाहत आहेत. यामुळे आता दिल्लीला फोन करुन मंत्रिमंडळ विस्तार करुन टाका, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.
"आमच्या काळात व्हायला हवं होतं, आम्हीही कमी पडलो"; अजित पवारांनी भरसभागृहात दिली कबुली
'गोगावले साहेब तुम्ही सुट शिवून आणलेला कधी घालयाचा, अध्यक्ष महोदय खूप जणांचे सुट वाया निघाले आहेत. त्यांच्या घरचे विचारत आहेत हे सुट का शिवून आणले आहेत, भरत गोगावले साहेब यांचा शपथविधी असेल तेव्हा मी असेल तिथू उपस्थित राहणार आहे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
अजित पवारांनी भरसभागृहात दिली कबुली
"महाराष्ट्राताला जर नंबर वन करायचं असेल तर आपल्या राज्यात असलेले प्रकल्प इतर राज्यांत जाऊ नयेत यासाठी आपणच काही तरी केलं पाहिजे. काही प्रकल्प विदर्भात आले होते, पण कामगारांच्या आंदोलनामुळे, कामगार-उद्योजक यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हे प्रकल्प बंद पडले किंवा दुसरीकडे निघून गेले. विदर्भाबद्दल बोलायचे झाले तर नागपूर-चंद्रपूरातील प्रकल्पांची आपण माहिती घेतली पाहिजे, बुट्टीबोरीचा प्रकल्प किंवा आणखीही काही प्रकल्प होते. फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री असताना ते झाले नाही. नंतर आमचेही सरकार आले, पण आम्हीही ते प्रकल्प पूर्ण करू शकलो नाही. आमच्या काळात व्हायला हवं होतं. पण आम्हीही कमी पडलो," अशा शब्दांत अजित पवारांनी कबुली दिली आणि विदर्भाच्या विकासाबाबत भूमिका मांडली.
"आम्ही काही गोष्टीत कमी पडलो, मी फक्त तुम्हाला दोष देत नाही. तुम्ही पण कमी पडलात, आम्ही पण कमी पडलो. त्यात विदर्भाचा काय दोष? आपल्या सर्वांना विदर्भाने, महाराष्ट्राने निवडून दिलं आहे त्यामुळे त्याकडे लक्ष दिले पाहिजे. राज्याच्या भल्यासाठी आताच्या सरकारने नवीन योजना आखल्या पाहिजेत. राज्यात आलेले किंवा येणारे प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाहीत यासाठी योग्य ती उपाययोजनाही केली पाहिजे", अशा शब्दांत अजित पवार यांना सभागृहात आपले मत व्यक्त केले.