Jayant Patil ( Marathi News ) : नागपूर- आज विधिमंडळात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी राज्यातील मुद्द्यांवरुन शिंदे-फडणवीस सरकारला घेरले. " राज्यातील महिलांना सुरक्षा देण्यात सरकार कमी पडत आहे, या सरकारच्या काळात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. पोलिस खात्यात पोलिस भरती करण्याची सरकार का टाळत आहे हे कळत नाही, असा असालही आमदार पाटील यांनी केला. उडता पंजाब सारखा आता उडता महाराष्ट्र करण्यासारख सुरू आहे, ड्रग्ज माफियांना राजाश्रय देण्याचं काम सध्याचं सरकार करत आहे, असा आरोपही आमदार जयंत पाटील यांनी केला.
भुजबळांची धाकधूक वाढणार: महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ३ जण माफीचे साक्षीदार? सुनावणी होणार!
"राज्याच्या आर्थिक नियोजनात बेशिस्तपणा सुरू आहे, सरकारकडे असणाऱ्या पैशापेक्षा मागणी जास्त आहे. काल मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं यात शेतकऱ्यांना मदतीचं सांगितलं. म्हणजे जर मार्च आधी सरकारला ते द्यायचे असतील तर सरकारला आता १ लाख ६० हजार कोटींची गरज आहे. मार्चच्या आधी एवढ उत्पन्न वाढण्याची शक्यता नाही. सदस्यांनी मागणी करायची ती पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मंजूर करायची या पद्धतीने कधीच काम पूर्ण होणार नाही. या सरकारने १ लाख कोटींची हमी घेतली आहे. हमी घेणे एवढी सोपी गोष्ट नाही. एमएमआरडी सारखी संस्था पूर्ण अडचणीत आली आहे, म्हाडासारखी संस्थाही पूर्ण अडचणीत आली आहे. राज्यातील सिंचन योजनाही अडचणीत आल्या आहेत, असंही आमदार पाटील म्हणाले.
"आधी महिलांचं संरक्षण करा"
आमचा अयोध्येला विरोध नाही. आधी आमच्या सीतामायेला संरक्षण द्या, राज्यातील महिलांचे संरक्षण करा. महाराष्ट्रात ८ हाजारांहून अधिक दंगली झाल्या, बिहारमध्ये ४ हजार दंगली झाल्या. आपल्या राज्यात दंगली घडण्याचा विक्रम झाला आहे. रामनवमीला हल्ली दंगली होत आहेत. कोल्हापुरातही झाली. कोल्हापुरात माणसं कुठून आली माहित नाही, पण दंगल झाली. आम्हीही हिंदू आहोत पण इतरांच्या अभिमानाला आपण डिवचून चालणार नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणवीस एकदा म्हणाले मी फडतूस नाही काडतूस आहे, पण नागपूरात हे काय सुरू आहे. नागपूर गुन्हेगारांची राजधानी झाली आहे. रोज तीन घरात चोरी होतात. या वर्षी २५० पर्यंत चोरीच्या घटना घडल्या आहेत. नागपुरात गेल्या काही वर्षापासून गुन्हेगाराचे प्रमाण वाढले आहे. गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालून यावर काम करावं, असंही जयंत पाटील म्हणाले.