Winter Session Maharashtra : 'त्या' अविश्वास ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवारांची सही का नाही; भास्कर जाधवांनी सांगितलं कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 02:39 PM2022-12-30T14:39:20+5:302022-12-30T14:40:23+5:30

काल महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजित यांची या प्रस्तावावर सही नसल्याचे समोर आले आहे.

Winter Session Maharashtra Why opposition leader Ajit Pawar does not sign 'that' no-confidence motion; Bhaskar Jadhav told the reasons | Winter Session Maharashtra : 'त्या' अविश्वास ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवारांची सही का नाही; भास्कर जाधवांनी सांगितलं कारणं

Winter Session Maharashtra : 'त्या' अविश्वास ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवारांची सही का नाही; भास्कर जाधवांनी सांगितलं कारणं

googlenewsNext


काल महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजित यांची या प्रस्तावावर सही नसल्याचे समोर आले आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे, शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

नागपुरात सुरू असलेले हिवाळी अधिवेशन पहिल्या दिवसापासून वादळी ठरले. विरोधी पक्षांनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप करत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर दुसरीकडे, कर्नाटक विरोधी ठराव संमत करण्यात आला. अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अविश्वास ठरावाचा प्रस्तावाचे पत्र काल विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे देण्यात आले आहे. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सही नसल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकजूट नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. 

MNS Raj Thackeray : “राजकारणात या… मी संधी द्यायला तयार आहे,” राज ठाकरेंनी केलं आवाहन

यावर बोलताना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात प्रस्ताव दुर्दैवाने आणावा लागला. एखादा विषय नियमानुसार आहे का असा विचार न करता ते निर्णय घेत आहेत. मी काल सभागृहात त्यांना म्हटले होते, तुमच्या कार्यकीर्दीला डाग लावू देऊ नका, त्यांनी तसेच केले आहे. 

'एखादा प्रस्ताव दाखल करायचा असेल तर त्यावर सर्व सदस्यांची सही आवश्यक नसते. तो प्रस्ताव दाखल केल्यानंतर सभागृहात आम्ही तुम्हाला एकसंघ दिसू, असंही आमदार भास्कर जाधव म्हणाले. 

काल महाविकास आघाडीची काँग्रेस विधीमंडळाच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला, या प्रस्तावार महाविकास आघाडीतील ३९ आमदारांनी सह्या केल्या. पण, हा ठराव तांत्रिक पातळीवर टिकणे अवघड असल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सही केली नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अविश्वास ठराव दिला असला तरी याबाबत महाविकास आघाडीत एकमत नसल्याचे चित्र समोर आले आहे. 

या संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.'या प्रस्तावा संदर्भात मला काही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. 

 या प्रस्तावामध्ये आमदार नाना पटोले, अजय चौधरी, नितीन राऊत, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, आमदार वर्षा गायकवाड, आमदार प्रतिभा धानोरकर, विक्रमसिंह सावंत, संजय जगताप, संग्राम थोपटे, नितीन देशमुख, यशवंत माने, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे या आमदारांच्या सह्या आहेत, यात राष्ट्रवादी, काँग्रेसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आमदारांच्या सह्या आहेत. पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सही नसल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहेत.  

Web Title: Winter Session Maharashtra Why opposition leader Ajit Pawar does not sign 'that' no-confidence motion; Bhaskar Jadhav told the reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.