शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
3
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
4
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
5
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
6
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
7
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
8
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
9
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
10
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
12
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
13
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
14
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
15
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
17
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
18
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
19
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
20
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा

नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी दिवस-रात्र काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 10:35 AM

नागपुरातील हिवाळी अधिवेशाची तारीख जाहीर होताच अधिवेशनाच्या तयारीला जोर चढला आहे.

ठळक मुद्देसात तारखेपर्यंत आटोपणार काम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील हिवाळी अधिवेशाची तारीख जाहीर होताच अधिवेशनाच्या तयारीला जोर चढला आहे. येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या दिवसरात्र काम सुरू असून येत्या ७ तारखेपर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.तब्बल महिनाभर चाललेल्या सत्तानाट्या शेवट होऊन राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन भरवण्याची घोषणाही विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.त्यानुसार इकडे अधिवेशनाच्या तयारीला वेग आला आहे. तसे पाहता अधिवेशनाची तयारी गेल्या महिनाभरापासून सुरूच होती. नागभवन, रविभवन येथील मंत्र्यांची निवासस्थानांची रंगरंगोटी व डागडुजीची कामे सुरु होती. ती आता जवळपास झालेली आहे. फर्निचर व वस्तू लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत.आज सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व कंत्राटदारांची बैठक घेऊन कामासंदर्भात आवश्यक सूचनाही दिल्या.यात कोणत्याही परिस्थितीत ७ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी दिवस-रात्र काम केले जात आहे.

विधिमंडळातील अधिकारी रविवारी घेणार आढावाहिवाळी अधिवेशनाच्या तयारी संदर्भातील आढावा घेण्यासाठी मुंबई विधिमंडळातील अधिकारी हे येत्या रविवारी ८ तारखेला नागपुरात येणार असल्याची माहिती आहे. नागपुरातील अधिकारी हे मुंबईतील विधिमंडळ सचिवालयतील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळेच ७ तारखेपर्यंत सर्व कामे आटोपण्याची सर्व कामाला लागले आहेत.

सापांच्या बंदोबस्तांसाठी सर्पमित्रांची मदतमागच्या अधिवेशनात रविभवन, नागभवन परिसरात मोठ्या प्रमाणावर साप निघाले हांते. मंत्र्यांच्या कॉटेज परिसरातही साप आढळून आले होते. त्यामुळे सापांच्या बंदोबस्तासाठी यावेळी सर्पमित्रांची खास मदत घेण्यात आली आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन