शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

नागपूर हिवाळी अधिवेशनात विधिमंडळावर धडकणार एकूण तब्बल ७० मोर्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 9:54 AM

सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी ७० मोर्चे धडकणार आहेत.

ठळक मुद्देआज सोमवारी पाच मोर्चे: २२६ सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे, हेल्मेट कॅमेऱ्यांची नजर

आॅनलाईन लोकमतनागपूर : सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी ७० मोर्चे धडकणार आहेत. यात धनगर युवक, अंगणवाडी कर्मचारी, कोतवाल संघटना, विकलांग संघर्ष समिती, क्षयरोग नियंत्रण कर्मचारी, महानुभाव महामंडळ, आदिम कृती समिती, पोलीस पाटील, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, पाली विद्यापीठ निर्मिती संघर्ष समिती, आॅटोरिक्षा चालक, संविधान सुरक्षा सेना, परिट सेवा मंडळ यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या मोर्चातून हल्लाबोल करणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मोर्चांची संख्या वाढली आहे. यामुळे हे अधिवेशन मोर्चांच्या मागण्यांना घेऊन गाजणार असल्याचे चित्र आहे.शहराच्या चारही भागातून येणाऱ्या मोर्चांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे. नागपुरात सुरू असलेल्या मेट्रो आणि सिमेंट रस्त्यांच्या कामांचा मोर्चा व वाहतूक व्यवस्थेला फटका बसू नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली आहे. सुरक्षेसाठी अडीच हजार पोलिसांची अतिरिक्त कुमक नागपुरात दाखल झाली आहे. मोर्चेकरांवर लक्ष ठेवण्यासाठी २२६ सीसीटीव्ही तैनात करण्यात आले आहे. याशिवाय ड्रोन कॅमेरे, हेल्मेट कॅमेऱ्यांची नजर मोर्चेकऱ्यांवर असणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :Politicsराजकारण