नागपूर : जिल्ह्यात तब्बल आठवडाभरानंतर कोरोना संक्रमितांच्या मृत्यूचा आकडा ६० च्या खाली आला आहे. ८ एप्रिलला एकाच दिवसात ७३ मृत्यूची नोंद झाली होती. हा विक्रमी आकडा होता. मृत्यूसंख्येच्या वाढत्या आकड्यामुळे प्रशासन काळजीत आहे. बुधवारी नागपूर जिल्ह्यात ५७ मृत्यू झाले तर, ५,९९३ नवे संक्रमित रुग्ण मिळाले. जिल्ह्यात आजवर २,९७,०३६ संक्रमित मिळाले असून, ५,९६० मृत्यू झाले आहेत.
मागील २४ तासामध्ये २१,५५८ नमुन्यांची तपासणी झाली. यात शहरातील १३,९२५ तर ग्रामीणमधील ७,६३३ आहेत. यामध्ये १४,४७५ आरटी-पीसीआर आणि ७,०८३ ॲन्टिजेन टेस्ट आहेत. आतापर्यंत एकूण १८,९४,९७१ नमुन्यांची तपासणी झाली आहे. ३,९९३ संक्रमित दुरुस्त झाले असून, यात शहरातील २,८४८ आणि ग्रामीणमधील १,१४५ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण २,२८,०७१ संक्रमित सुधारले आहेत. ही टक्केवारी ७६.७८ वर पोहचली आहे. आज आढळलेल्या संक्रमितांमध्ये शहरातील ३,६१३ तर ग्रामीणमधील २,३७५ तसेच जिल्ह्याबाहेरील ५ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ३५, ग्रामीणमधील १७ आणि जिल्ह्याबाहेरील ५ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात २,२३,९१६, ग्रामीणमध्ये ७२,००८ आणि जिल्ह्याबाहेरील १,११२ पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात ३,७१२, ग्रामीणमध्ये १,३१८ आणि जिल्ह्याबाहेरील ९३० जणांचे मृत्यू झाले आहेत.
...
खासगी लॅबमध्ये तपासण्या वाढल्या
मनपाकडून १४ एप्रिलपासून सरकारी केंद्रांवर फक्त ॲन्टिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे खासगी लॅबमध्ये तपासण्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील २४ तासामध्ये १०,९१३ नमुन्यांच्या विक्रमी तपासण्या झाल्या. यातील ४,४२७ पॉझिटिव्ह आले. याशिवाय ७,०८३ ॲन्टिजेन टेस्ट झाल्या, यातील ५१२ पॉझिटिव्ह आले. मेडिकलमध्ये १,८३४ नमुन्यांपैकी ६०१, मेयोमध्ये १,७२८ पैकी ४५३ नमुने पॉझिटिव्ह आले. मात्र एम्स, नीरी, नागपूर विद्यापीठाच्या लॅबमध्ये तपासण्या झाल्या नाही.
...
४९,४३० रुग्ण गृहविलगीकरणात
नागपूर जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ६३,००५ झाली आहे. यात शहरातील ३९,३८७, ग्रामीणमधील २३,६१८ रुग्णांचा समावेश आहे. यातील गृहविलगीकरणात असलेल्यांची संख्या ४९,४३० आहे. सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये १३,५७५ संक्रमित दाखल आहेत.
ॲक्टिव्ह : ६३,००५
बरे झालेले : २,२८,०७१
मृत : ५,९६०
....