'आमच्याशिवाय काँग्रेसला सत्तेचा गुलाल लागणार नाही'; राष्ट्रवादीने डिवचले, शिवसेनेचाही टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 07:46 AM2022-03-18T07:46:09+5:302022-03-18T07:46:17+5:30

नागपूर : महापालिकेची तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द होताच महाविकास आघाडीत धुळवड सुरू झाली आहे. आता कोणत्याही परिस्थितीत एक ...

'Without us, the Congress will not have the guts of power'; That is what the NCP has said | 'आमच्याशिवाय काँग्रेसला सत्तेचा गुलाल लागणार नाही'; राष्ट्रवादीने डिवचले, शिवसेनेचाही टोमणा

'आमच्याशिवाय काँग्रेसला सत्तेचा गुलाल लागणार नाही'; राष्ट्रवादीने डिवचले, शिवसेनेचाही टोमणा

Next

नागपूर : महापालिकेची तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द होताच महाविकास आघाडीत धुळवड सुरू झाली आहे. आता कोणत्याही परिस्थितीत एक किंवा दोन सदस्यीय प्रभाग होतील. त्यामुळे काँग्रेसलाच आमच्या मागे धावावे लागेल. राष्ट्रवादीला सोबत घेतल्याशिवाय काँग्रेसला सत्तेचा गुलाल लागूच शकत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीने काँग्रेसला डिवचले आहे, तर शिवसेनेनेही ‘दो से भले तीन’ हे काँग्रेसने समजून घ्यावे, असा टोमणा मारला आहे.

तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द होताच राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे, तर पाच राज्यांंच्या निकालात मात मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खचले असून, राष्ट्रवादी व शिवसेनेला काँग्रेसची कोंडी करण्याची आयती संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेने संघटन बळकट करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत, तर काँग्रेसने डिजिटल नोंदणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.

राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे म्हणाले, पाच राज्यांचे निकाल पाहता काँग्रेसला ग्राफ घसरलेला दिसतो. त्यामुळे राष्ट्रवादीला कमजोर समजण्याची चूक काँग्रेसने करू नये. तीन सदस्यीय प्रभागात राष्ट्रवादीची ताकद काहीशी कमी पडली असती. मात्र, आता प्रभागाचा आकार लहान झाला तर राष्ट्रवादी अधिक भक्कम होईल व काँग्रेसची मनधरणी करण्याची गरज पडणार नाही. राष्ट्रवादीकडे गमविण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे आता विचार काँग्रेसला करायचा आहे, असा इशारा त्यांनी दिला.

शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे म्हणाले, तीनही पक्षांनी एकत्र लढायला हवे, अशीच आमची भूमिका आहे. मात्र, काँग्रेसकडून कधीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. एकत्र नाही लढले तर काँग्रेसचेच जास्त नुकसान होईल. शिवसेनेची सर्व जागांवर लढण्याची तयारी सुरू आहे. सहाही विधानसभेतील मुलाखती आटोपल्या आहेत. आता शिवसेना स्वत:हून काँग्रेसला प्रस्ताव देणार नाही. काँग्रेसचा प्रस्ताव आला तरच विचार करू, असा इशाराही मानमोडे यांनी दिला.

Web Title: 'Without us, the Congress will not have the guts of power'; That is what the NCP has said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.