शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नागपुरातील गोंडवाना संग्रहालयाला मिळतेय गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:21 PM

गोंड राजे बख्त बुलंद शहा उईके यांनी ३५० वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या नागपुरात गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयाची निर्मिती करण्यात येणार होती. पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती यांनी या संस्थेला स्वायत्त संस्था म्हणून मान्यता देत, एक उपकेंद्र नागपूर येथे स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.

ठळक मुद्देप्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठकसुराबर्डीत होणार संग्रहालयाची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासींचे कलाजीवन, सांस्कृतिक जतन व संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय उभारण्यासाठी शासनाने २००२ ला मान्यता दिली. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून हे संग्रहालय उभारण्यात येणार होते. परंतु या संग्रहालयाच्या उभारणीत गेल्या १७ वर्षात जागेच्या संदर्भात अनेक अडचणी आल्या. अखेर संग्रहालयाला सुराबर्डी येथे जागा मिळाली. त्यामुळे प्रशासनानेसुद्धा संग्रहालयाच्या कामाचा वेग वाढविला आहे. आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या अध्यक्षतेत संग्रहालयासंदर्भातील बैठक मुंबईत पार पडली आहे.गोंड राजे बख्त बुलंद शहा उईके यांनी ३५० वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या नागपुरात गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयाची निर्मिती करण्यात येणार होती. पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती यांनी या संस्थेला स्वायत्त संस्था म्हणून मान्यता देत, एक उपकेंद्र नागपूर येथे स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. या उपकेंद्राला गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय असे नाव देण्यात आले. यात आदिवासी जीवन कला व संस्कृतीचे दर्शन घडविणाºया मौल्यवान व दुर्मिळ वस्तूंचा संग्रह, आदिवासींचे दागदागिने, देव देवता, मुखवटे, दैनंदिन वापराच्या वस्तू व शेतीसाठी वापरणाºया वस्तू, हत्यारे, पारंपरिक पोषाख, साहित्याचे जतन, बोली भाषेचे संवर्धन करण्यात येणार होते. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने २०१४ मध्ये १० कोटी व २०१५ मध्ये ११ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यातून बांधकामाचा खर्च करण्यात येणार होता. संग्रहालयासाठी शहरात जागाच उपलब्ध होत नव्हती. संग्रहालयासाठी सरकारचा जागेचा शोध संपला असून, अमरावती रोडवरील सुराबर्डी येथे संग्रहालयाला १२ एकर जागा देण्यात आली आहे.संग्रहालयाच्या संदर्भात आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, सहसचिव सुनील पाटील, उपसचिव लक्ष्मीकांत ढोके, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. किरण कुळकर्णी, सहसंचालिका नंदिनी आवडे, सहआयुक्त विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच प्राथमिक बैठक पार पडली. बैठकीत सल्लागार समितीचे चार समूह तयार करण्यात आले. लँडस्केप डेव्हलपमेंट, वास्तुविशारद नियोजन समूह, संग्रहालयातील संग्रह, संकल्पनेनुसार आदिवासी समुदायाशी सहभाग वाढवण्यासाठी समिती तयार करण्यात आली आहेत.यावेळी भोपाळच्या मानव संग्रहालयाचे प्रतिनिधी एस. के. पांडे, इतिहास संशोधक डॉ. मधुकर कोटनाके, वास्तू विशारद भक्ती ठाकूर, व्हीआरसीच्या वास्तू विशारद विभागाचे सहा. प्राध्यापक डॉ. अक्षय पाटील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे सहा. प्राध्यापक डॉ. एस. आय. कोरेटी, वाचा म्युझियमचे संचालक मदन मीणा, वास्तू विशारद अमरजा निंबाळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाचे संचालक एस. एस. मुजुमदार आदी तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभागाच्या वतीने गोंडवाना संग्रहालयासंदर्भात बराच पाठपुरावा करण्यात आला होता. संघटनेच्या प्रयत्नाला यश आले आहे. आदिवासी समाजाच्या आदिम संस्कृतीचे जतन व्हावे, आदिवासी समाजाचा ऐतिहासिक वारसा वर्षानुवर्षे जपला जावा हा आमचा उद्देश आहे.- दिनेश शेराम, अध्यक्ष अ.भा. आदिवासी विकास परिषद, नागपूर

टॅग्स :Governmentसरकार