माैदा : घराच्या जागेच्या वादातून आराेपी महिलेने एका महिलेस चावा घेऊन जखमी केले. पाेलिसांनी आराेपी महिलेविरुद्ध गुन्हा नाेंदवून तिला अटक केली आहे. ही घटना अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काेदामेंढी येथे शुक्रवारी (दि. २४) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
सीमा चैतराम हेडावू (२४, रा. काेदामेंढी, ता. माैदा) असे अटकेतील महिलेचे नाव असून, रूपाली नीतेश जांबुळकर (२५, रा. काेदामेंढी, ता. माैदा) असे जखमी महिलेचे नाव आहे. रूपाली जांबुळकर यांना जुने घर पाडून नवीन घर बांधायचे असल्याने त्यांनी जुने घर पाडले असता, जागेच्या वादातून आराेपी महिलेने रूपालीच्या डाव्या हाताच्या बाेटाला व उजव्या हाताच्या मनगटाजवळ चावा घेऊन जखमी केले. शिवाय रूपालीचे नातेवाईक सुनीता जांबुळकर व तुळसाबाई जांबुळकर यांना शिवीगाळ करून हाताबुक्कीने मारहाण करीत त्यांना मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अराेली पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नाेंदवून तिला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस हवालदार प्रशांत काळे करीत आहेत.