नागपूर : आजाराला कंटाळून एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी ६.३० ते ६.४५ च्या दरम्यान ही घटना घडली.
सोनिया कौर हरप्रीतसिंग बग्गा (वय ३८) असे मृत महिलेचे नाव असून त्या वर्धा मार्गावरील नवजीवन कॉलनीत राहत होत्या. सोनिया यांना मानसिक आजार जडला होता. त्यांचा उपचारही सुरू होता. मात्र, लाभ होत नसल्याने सोनिया कंटाळल्या होत्या. रविवारी सकाळी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली. ‘आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे, कोणालाही दोषी धरू नये’, असे त्यांनी या चिठ्ठीत नमूद केले आहे. सोनिया यांचे पती हरप्रीतसिंग प्रीतमसिंग बग्गा यांनी दिलेल्या सूचनेवरून धंतोलीच्या महिला पोलीस उपनिरीक्षक ढगे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---