खापरखेडा : कपडे वाळायला टाकत असताना अनवधानाने वायरला स्पर्श झाला आणि महिलेला जाेरात विजेचा धक्का लागला. त्यातच तिचा मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा माईन्स वलनी येथे नुकतीच घडली.
अर्चना जितेंद्र सिंग (४५, रा. पिपळा माईन्स, वलनी, ता. सावनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या धुतलेले कपडे वाळविण्यासाठी दाेरीवर टाकत हाेत्या. त्यातच अनवधानाने त्यांचा दाेरीजवळ असलेल्या विजेच्या वायरला स्पर्श झाला आणि त्यांना जाेरात विजेचा धक्का लागला. त्यात गंभीर जखमी झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना लगेच नागपूर शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक धाेपाडे करीत आहेत.