..............-
गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
नागपूर : आपल्या घरी छताच्या लाकडी बल्लीला दोरी बांधून एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ सप्टेंबरला सकाळी ७ वाजता घडली. विलास शामराव निखाडे (५३, रा. नंदाजीनगर, चिटणवीसपूरा पोलीस चौकीमागे) असे मृतकाचे नाव आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरी छताच्या बल्लीला दोरी बांधून गळफास घेतला. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. कोताली पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे.
............
विष पिऊन महिलेने संपविले जीवन
नागपूर : विष पिऊन एका महिलेने आपले जीवन संपविल्याची घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. शारदा शंकर खुबाळकर (४५ रा. मा भवानीनगर, प्लॉट नं. १०५) असे मृत महिलेचे नाव आहे. १० सप्टेंबरला दुपारी एक वाजता विष प्राशन केले. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान १३ सप्टेंबरला दुपारी १.४५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
..............