आॅनलाईन लोकमतनागपूर : रिफन्ड आणि बोनसचे आमिष दाखवून एका महिलेला आरोपीने दोन लाखांचा गंडा घातला. दिव्या नरेंद्र हंसराजानी (वय ४८) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या आंबेडकर चौक, लकडगंजमध्ये राहतात.२२ नोव्हेंबर २०१७ ला त्यांना ०८७४३९०१६११ क्रमांकाच्या मोबाईलवरून फोन आला. मॅक्स लाईफ इन्शोरन्सचा हप्ता (किस्त) आपण इसिएसद्वारे अॅक्सीस बँकेतून न भरता दुस-या बँकेतून भरल्यास १० टक्के रक्कम परत मिळेल, असे फोन करणारा म्हणाला. त्याच्यावर विश्वास ठेवून दिव्या हंसराजानी यांनी आरोपीने सांगितलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या खाते क्र ६२९ ७०१० ०६२१७ १ लाख, ४६ हजार, ३९४ रुपये जमा केले. त्यानंतर त्याने बोनस जमा झाल्याची बतावणी करून बँक आॅफ बडोदा च्या खाते क्रमांक ०८४५०१ ०००००४२१ मध्ये ५४ हजार रुपये जमा करण्यास बाध्य केले. अशा प्रकारे २२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१७ च्या कालावधीत वेगवेगळळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन करणा-या आरोपीने २ लाख, ३९४ रुपये जमा केल्यानंतर आरोपी पुन्हा वेगवेगळ्या नावाने हंसराजानी यांना रक्कम जमा करायला सांगू लागला. त्याचा संशय आल्याने त्यांनी आपल्या बँक आणि इन्शोरन्स खात्याची तपासणी केली असता आरोपीने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरूध्द फसवणूक तसेच तंत्रज्ञानाच्या गैरवापराबाबतच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.