शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

भिंतीच्या वादातून महिलेचा खून, पतीस मारहाण; रामटेक तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2022 2:35 PM

डाेंगरी येथील घटना; आराेपीस अटक

रामटेक (नागपूर) : भिंतीच्या जागेवरून उद्भवलेला वाद विकाेपास गेला. त्यामुळे दाम्पत्य पाणी भरण्यासाठी हॅण्डपंपजवळ येताच आराेपीने त्यांच्याशी भांडण उकरून काढत दाेघांनाही लाेखंडी राॅडने जबर मारहाण केली. त्यात महिलेचा मृत्यू झाला तर तिचा पती गंभीर जखमी झाला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेक-मुसेवाडी राेडवरील डाेंगरी येथे मंगळवारी (दि. १) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

ओमेश्वरी शामदयाल शरणागत (४५) असे मृत महिलेचे तर शामदयाल हरिराम शरणागत (५५) असे जखमी पतीचे नाव असून, कैलास ऊर्फ बाल्या यशाेलाल शरणागत (३४) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. हे तिघेही डाेंगरी, ता. रामटेक येथील रहिवासी असून, शामदयाल व कैलास एकमेकांच्या नात्यात आहेत.

त्या दाेन्ही कुटुंबांमध्ये भिंतीच्या जागेवरून वाद हाेता. कैलासच्या घरासमाेर हॅण्डपंप आहे. ओमेश्वरी मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे त्या हॅण्डपंपवर पाणी आणण्यासाठी गेली हाेती. ती पाणी नेण्यासाठी आल्याचे दिसताच कैलासने तिच्याशी भांडायला सुरुवात केली. ताे ओमेश्वरीला अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत असताना तिचा पती शामदयाल हॅण्डपंपजवळ आला.

काही कळण्याच्या आत कैलासने लाेखंडी राॅडने दाेघांनाही मारहाण करायला सुरुवात केली. त्यात दाेघेही गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांनी त्या दाेघांनाही उपचारासाठी लगेच कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती ओमेश्वरीला मृत घाेषित केले. शिवाय, शामदयालवर उपचार सुरू केले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी रामटेक पाेलिसांनी भादंवि ३०२, ३०७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी कैलास शरणागत यास अटक केली.

अनैतिक संबंधाचा संशय

मृत ओमेश्वरी आणि शामदयाल यांना शुभम नावाचा तरुण मुलगा आहे. त्याचे कैलासच्या पत्नीसाेबत अनैतिक संबंध असल्याचा कैलासला संशय हाेता. त्यामुळे कैलास नेहमीच शामदयाल व त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी द्यायचा, अशी माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली. याच संशयातून त्याने ओमेश्वरीचा खून केल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरramtek-acरामटेक