शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

भाडेकरूकडून महिलेवर बलात्कार

By admin | Published: May 17, 2016 2:14 AM

बदनामीचा धाक दाखवून तब्बल दोन वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या भाडेकरू आरोपीविरुद्ध अखेर पीडित महिलेने तक्रार

अश्लील क्लिप बनवून धमकी : दोन वर्षांनंतर तक्रार नागपूर : बदनामीचा धाक दाखवून तब्बल दोन वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या भाडेकरू आरोपीविरुद्ध अखेर पीडित महिलेने तक्रार नोंदविली. त्यानुसार हुडकेश्वर पोलिसांनी अभिजित शेषराव हजारे (वय ३०) नामक आरोपीवर गुन्हा दाखल केला. आरोपी हजारे रोहणा (ता. काटोल) येथील रहिवासी आहे. खासगी नोकरी करणारा आरोपी हजारे २०१४ ते मार्च २०१६ या कालावधीत हुडकेश्वरमधील एका भाड्याच्या घरात आई-वडिलांसह राहत होता. घरची महिला (वय २४) हजारे कुटुंबीयांसोबत आपुलकीने वागत होती. त्याचा त्याने गैरफायदा घेतला. ३१ डिसेंबर २०१४ ला थर्टी फर्स्टच्या कार्यक्रमाची संधी साधून त्याने घरात कुणी नसताना तिला गुंगीचे औषध दिले. तिच्यावर बलात्कार करून तिचे नको त्या अवस्थेतील फोटो काढले. मोबाईलने व्हिडिओ क्लिपही बनविली. हे फोटो आणि व्हिडिओ क्लिप दाखवून तो तिच्याशी वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित करीत होता. तिच्यावर दोन वर्षांत अनेकदा बलात्कार केल्यानंतर मार्च २०१६ मध्ये आरोपीने भाड्याचे घर सोडले आणि तो बहादुरा येथे राहायला गेला. त्यामुळे महिलेला दिलासा मिळाला. (प्रतिनिधी)अखेर नोंदविली तक्रार त्याचे लग्न दुसरीकडे जुळल्याचे कळाल्याने पीडित महिलेने पिच्छा सुटला म्हणून सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र आरोपीने तिला अलीकडे फोन करून धमकावणे सुरू केले. यापुढेही अनैतिक संबंध असेच सुरू ठेवण्यासाठी महिलेवर दबाव आणू लागला. नकार दिल्याने त्याने तिला बदनामीची धमकी दिली. परिणामी पीडित महिला प्रचंड दडपणात आली. याचवेळी पतीने तिला विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार त्याला सांगितला. बराच विचार केल्यानंतर पती-पत्नीने हुडकेश्वर ठाण्यात रविवारी तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक एस.सी. गवई यांनी आरोपी हजारेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला. त्याचा शोध घेतला जात आहे.