लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारूची तस्करी करणाऱ्या महिलेस रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक करून तिच्याकडून १३ हजार ४४७ रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक उपनिरीक्षक सीताराम जाट, रामनिवास यादव प्रधान आरक्षक शशिकांत गजभिये, अश्विनी मुळतकर, नीता माझी हे प्लॅटफार्मवर गस्त घालत होते. तेवढ्यात प्लॅटफार्म क्रमांक २ वर इटारसी एण्डकडील भागात दोन महिला दोन किलो वजन असलेल्या बॅगसह आढळल्या. बॅगमध्ये काय आहे अशी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनी आपले नाव पारू कृष्णा प्रसाद पिल्ले (५०), रामबाई नरसैय्या इरगुल्ला (५०) रा. ऊर्जानगर पोस्ट ऑफिसजवळ, नेरी, चंद्रपूर असे सांगितले. सहायक उपनिरीक्षक सी. बी. अहिरवार यांनी पंचासमक्ष बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १३४४७ रुपये किमतीच्या ११ बॉटल आढळल्या. निरीक्षक रवी जेम्स यांच्या आदेशानुसार जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.
दारूची तस्करी करणाऱ्या महिलांना नागपूर रेल्वेस्थानकावर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 8:34 PM
दारूची तस्करी करणाऱ्या महिलेस रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक करून तिच्याकडून १३ हजार ४४७ रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.
ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : १३ हजाराची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन