लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : दाेन घटनांमध्ये चाेरट्यांनी दाेन महिलांच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना बुधवारी (दि. २५) दुपारी घडली. पाेलिसांनी या दागिन्यांची एकूण किंमत एक लाख रुपये असल्याचे सांगितले असले तरी, त्या दागिन्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत २ लाख ४३ हजार रुपयांच्या आसपास आहे. वाढत्या घटनांमुळे महिलांनी त्यांच्याकडील दागिने सांभाळून ठेवणे गरजेचे झाले आहे.
बुधवारी श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी असल्याने शीलाताई अशोकराव काळे (६२, नरेंद्रनगर, रिंग रोड, नागपूर) या त्यांच्या कुटुंबीयांसह आदासा येथील गणपतीच्या दर्शनासाठी आल्या हाेत्या. शासनाच्या दिशानिर्देशानुसार त्यांनी मंदिराच्या पायरीवर पूजा केली आणि परत जायला निघाल्या. दरम्यान, अज्ञात तरुणाने त्यांच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेत पळ काढला. या साडेचार ताेळ्याच्या साेन्याच्या मंगळसूत्राची किंमत ९० हजार रुपये असल्याचे पाेलिसांनी सांगितले असून, ते बाजारभावाप्रमाणे किमान २ लाख २५ हजार रुपयांचे असल्याचे जाणकार व्यक्तींनी सांगितले.
दागिने चाेरीची दुसरी घटना बुधवारी दुपारी सावनेर शहरातील छिंदवाडा मार्गावरील पाॅवर स्टेशनजवळ घडली. महिला राेडच्या कडेने पायी जात असताना माेटरसायकलवर आलेल्या तरुणाने त्या महिलेल्या गळ्यातील साडेतीन ग्रॅमचे साेन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्या मंगळसूत्राची बाजारभावाप्रमाणे किंमत १८ हजार रुपये असल्याचे महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले. या दाेन्ही घटनांमध्ये सावनेर पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
...
चाेरट्यांचा बंदाेबस्त करा
हल्ली सावनेर शहरात रकमेची बॅग लंपास करण्यासाेबतच महिलांच्या गळ्यातील साेन्याचे दागिने चाेरून नेण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. माहिती मिळताच पाेलीस उपनिरीक्षक सागर कारंडे यांनी आदासा मंदिर परिसराची पाहणी केली. परंतु, त्यांना ठाेस पुरावा मिळाला नाही. काही दिवसापूर्वी सावनेर शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमाेरून तरुणाकडील रकमेची बॅग पळविल्याची घटना घडली हाेती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली हाेती. मात्र, चाेरट्याला ताब्यात घेण्यात पाेलिसांना अद्यापही यश आले नाही. नागरिकांनी गर्दीत सांंभाळून राहण्याचे आवाहन पाेलीस अधिकारी करीत असून, दुसरीकडे चाेरट्यांचा याेग्य बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.