लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी दोन रेल्वेगाड्यांचा ताबा महिला कर्मचाऱ्यांनी घेतला. यात नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसचा समावेश आहे. या रेल्वेगाड्यांना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता, दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘सिनियर डीसीएम’ अर्जुन सिबल यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांनी रवाना केलेल्या इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये लोकोपायलट म्हणून माधुरी उराडे यांनी तर सहायक लोकोपायलट म्हणून मंजू वैद्य यांनी गाडीचा ताबा घेतला तर गार्डची जबाबदारी पूनम मेश्राम यांनी पार पाडली. गाडीतील इतर महिला कर्मचाऱ्यांमध्ये कंडक्टर वृंदा देसाई, तिकीट तपासणी कर्मचाऱ्यात शालिनी मीना, छाया गर्गे, महानंदा वाटकर यांचा समावेश होता. इंटरसिटी एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी उपस्टेशन व्यवस्थापक दीपाली मानकरे, अनघा मेश्राम यांच्यासोबत पॉर्इंट वूमेन अगस्था फ्रान्सिस उपस्थित होत्या. नागपूर रेल्वे स्थानकावरून सकाळी ७.३० वाजता महिलांद्वारा संचालित इंटरसिटी एक्स्प्रेस रवाना होत असताना वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टीआरओ) महेश कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र, स्टेशन संचालक डी. एस. नागदेवे, अधिकारी आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दुसरीकडे सकाळी ९ वाजता मुंबई-गोंदिया-विदर्भ एक्स्प्रेसला वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांनी हिरवी झेंडी दाखविली. विदर्भ एक्स्प्रेसची कमान गार्ड कौशल्या साहू, लोकोपायलट सुनीता चौधरी, सहायक लोकोपायलट स्नेहा सहारे यांच्यासह तिकीट तपासणी कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला यांनी सांभाळली. यावेळी वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता आर. के. पटेल यांच्यासह महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.महिलांना संधी मिळावयास हवी
महिलांनी घेतला इंटरसिटी, विदर्भ एक्स्प्रेसचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 10:39 PM
जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी दोन रेल्वेगाड्यांचा ताबा महिला कर्मचाऱ्यांनी घेतला. यात नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसचा समावेश आहे. या रेल्वेगाड्यांना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता, दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘सिनियर डीसीएम’ अर्जुन सिबल यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
ठळक मुद्देनागपूर स्थानकावर ‘डीआरएम’ने दाखविली हिरवी झेंडी