नागपूर : नारीशक्ती वूमेन एम्पॉवर संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला. पहिल्या चरणात वृद्ध महिला, दुसऱ्या चरणात आदर्श सासू आणि तिसऱ्या चरणात प्रतिभावान महिलांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या संचालिका विशाखा मोडक व आसिफ यांचे स्वागत डॉ. कविता परिहार यांनी केले. आदर्श सासू म्हणून संध्या साहू, विमल सोलंकी, लक्ष्मी वर्मा व प्रमिला चलपे यांना सन्मानित करण्यात आले. प्रतिभाशाली महिला म्हणून संजीवनी चौधरी, लता इंगळे, राजकुमारी पोफरे, अश्विनी, अनिता ठाकूर, सायरा बानो, सुचित्रा यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी लक्ष्मी वर्मा यांनी मनमोहक नृत्य सादर केले. संजीवनी चौधरी यांनी लावणी सादरी केली. आभार अनिता ठाकूर यांनी मानले.
-------------
समर्पण सेवा समितीद्वारे ब्लँकेट्सचे वितरण
नागपूर : समर्प सेवा समितीच्या वतीने प्रभाग २४मधील नागरिकांना ब्लँकेट्स प्रदान केले. नगरसेवक अनिल गेंदरे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सचिव नरेश जुम्मानी, महेश ग्वालानी, जितेश सोहनदानी, जयप्रकाश वर्मा, इंद्रजित वासनिक उपस्थित होते.
............