हेल्पलाईनचा आधार :२० मिनिटात मिळते मदत दयानंद पाईकराव नागपूरअचानक एखाद्या प्रसंगी महिलांना एकट्याने रेल्वेचा प्रवास करण्याची गरज भासते. परंतु रेल्वेत वाढत चाललेल्या असामाजिक तत्त्वांच्या उपद्रवामुळे सहसा महिला रेल्वेत एकट्याने प्रवास करण्यास धजावत नाहीत. दारू पिऊन महिलांची छेड काढण्याचे प्रमाण रेल्वेत वाढले असल्यामुळे महिला असुरक्षित आहेत. परंतु मे २०१५ पासून रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या १८२ या हेल्पलाईन क्रमांकामुळे संबंधित महिलेच्या तक्रारीचा १५ ते २० मिनिटात निपटारा होत असल्यामुळे आता महिला न घाबरता सन्मानाने रेल्वेचा प्रवास करीत असून मे २०१५ पासून डिसेंबर २०१५ या कालावधीत २५० महिलांच्या तर जानेवारी २०१६ ते मार्च २०१६ दरम्यान ८४ महिलांच्या तक्रारींचा निपटारा रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षाने १८२ या क्रमांकावर आलेल्या मोबाईल कॉलमुळे करण्यात यश मिळविले आहे.
महिलांना रेल्वेचे सुरक्षा कवच
By admin | Published: March 14, 2016 3:05 AM