शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

आश्चर्य, नागपूरकर करतात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 9:03 PM

कधी काळी ग्रीन सिटी म्हणून नागपूर शहर ओळखले जात होते. आता ही ओळख पुसली जात असून, सिमेंट काँक्रिटचे जंगल, प्रदूषणाचे शहर, कचऱ्याचे शहर अशी नवी ओळख शहराला मिळत आहे. शहराला लाभलेल्या नव्या ओळखीचे परिणाम शहरातील रहिवाशांना सोसावे लागत आहे. एप्रिल महिन्यात नागपूरकर तापमानामुळे असहाय झाले आहे. वाढते काँक्रिटीकरण, वाहनांचे प्रदूषण थांबविणे प्रशासनाला सहज शक्य नाही. परंतु कचऱ्याचे शहर अशी ओळख प्रशासनाला पुसता येऊ शकते. आज १२०० मेट्रिक टन कचरा शहरातून गोळा होत आहे आणि २०१२ पासून तो केवळ साठविला जात आहे.

ठळक मुद्देजागतिक वसुंधरा दिवसप्लास्टिकबंदी, प्रक्रिया उद्योगाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कधी काळी ग्रीन सिटी म्हणून नागपूर शहर ओळखले जात होते. आता ही ओळख पुसली जात असून, सिमेंट काँक्रिटचे जंगल, प्रदूषणाचे शहर, कचऱ्याचे शहर अशी नवी ओळख शहराला मिळत आहे. शहराला लाभलेल्या नव्या ओळखीचे परिणाम शहरातील रहिवाशांना सोसावे लागत आहे. एप्रिल महिन्यात नागपूरकर तापमानामुळे असहाय झाले आहे. वाढते काँक्रिटीकरण, वाहनांचे प्रदूषण थांबविणे प्रशासनाला सहज शक्य नाही. परंतु कचऱ्याचे शहर अशी ओळख प्रशासनाला पुसता येऊ शकते. आज १२०० मेट्रिक टन कचरा शहरातून गोळा होत आहे आणि २०१२ पासून तो केवळ साठविला जात आहे.वसुंधरेच्या संवर्धनासाठी जगात ‘अर्थ डे नेटवर्क ’ ही संस्था कार्यरत आहे. २२ एप्रिल १९७० पासून संस्था ‘वसुंधरा दिवस’ साजरा करते. आज १९५ देशांमध्ये हा दिवस साजरा होतो. यावर्षी वसुंधरा दिवसाची थीम ‘प्लास्टिकबंदी’ आहे. वसुंधरेच्या संवर्धनाच्या बाबतीत बोलत असताना ‘प्लास्टिकबंदी’ ही नागपूरसारख्या विकसनशील शहरासाठीसुद्धा लागू होते. शहरातून दररोज निघणारा १२०० टन कचऱ्यापैकी १२ ते १५ टक्के म्हणजेच १५० मेट्रिक टन कचरा हा प्लास्टिकचा निघतो. महाराष्ट्र सरकारने प्लास्टिकबंदी केली, कारण प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे ती गरजेचीही आहे. त्याचे परिणाम मुंबईमध्ये २०१५ ला बघायलाही मिळाले आहे. नागपुरातही आज प्लास्टिकमुळे पारंपरिक जलस्रोत नष्ट होत आहे. शहरातील नाले, ड्रेनेज सिस्टिम प्लास्टिकमुळे चोक होत आहे. पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. प्लास्टिक नष्ट करण्यासाठी नागपुरात यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे फक्त प्लास्टिीक साठविले जात आहे. जो उन्हाळ्याच्या दिवसात लागलेल्या आगीमध्ये नष्ट होतो आहे. परंतु प्लास्टिक जळाल्याने जे रासायनिक घटक वातावरणात पसरत आहेत ते आजाराला निमंत्रण देणारे आहे. प्लास्टिक हे मनुष्यासाठीच नाही तर जनावरांसाठीसुद्धा धोकादायक ठरत आहे. बंदी लावली पण अंमलबजावणीचे काय?सरकारने यापूर्वीही प्लास्टिकबंदीच्या नावावर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅगच्या विक्रीवर बंदी घातली होती. ती अजूनही यशस्वी झाली नाही. मार्च २०१८ ला प्लास्टिकबंदीसंदर्भात निर्णय घेतला आहे. प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीसाठी अनेक शासकीय संस्थांना अधिकार दिले आहे. परंतु कुठलीच संस्था प्लास्टिकबंदीला गांभीर्याने घेत नसल्याने मार्केटमध्ये सर्रास प्लास्टिकची खरेदी-विक्री सुरू आहे.डम्पिंग यार्डमध्ये वाढतोय कचराशहरातून गोळा होणारा कचरा भांडेवाडीत साठविण्यात येतो. मनपाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हंजर या कंपनीला नियुक्त केले होते. कंपनीने येथे मोठा प्लांट टाकला. ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे टार्गेट होते. परंतु २०१२ मध्ये या प्लांटमध्ये आग लागली. तेव्हापासून हा प्लांट ठप्प पडला आहे. त्यामुळे भांडेवाडीत कचऱ्याचे ढिगारे वाढत आहेत. दररोज वाढता कचरा हा शहरासाठी खरोखरच धोकादायक आहे. कचऱ्यामुळे नागपूर शहराचा ५ ते ७ किलोमीटरचा परिसर सध्या बाधित होत आहे. प्रशासनासाठी हा कचरा भविष्यात एक आव्हान ठरणार आहे. कचरा असाच वाढत गेला तर त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागणार आहे. त्यामुळे प्लास्टिकबंदीसारख्या निर्णयावर परिणामकारक अंमलबजावणी व कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांच्या बाबतीत प्रशासनाने लक्ष वेधणे गरजेचे आहे.कौस्तुभ चॅटर्जी, समन्वयक, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नnagpurनागपूर