शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

वन विभागातर्फे लाकडांचा ई-लिलाव

By admin | Published: March 11, 2016 3:15 AM

वन विभागाने आपल्या डेपोतील लाकडांच्या लिलावासाठी ‘ई-लिलाव पोर्टल’ तयार केले आहे.

विक्रीसाठी पोर्टल : बल्लारशा डेपोतून शुभारंभनागपूर : वन विभागाने आपल्या डेपोतील लाकडांच्या लिलावासाठी ‘ई-लिलाव पोर्टल’ तयार केले आहे. विशेष म्हणजे, हा देशभरातील पहिला प्रयोग असून, वन विभागाने या ई-लिलाव पद्घतीचा अलीकडेच बल्लारशा येथील डेपोतून शुभारंभ केला असल्याची माहिती वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. सिन्हा यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. ते पुढे म्हणाले, वन विभागातील लाकडांच्या लिलाव प्रक्रियेत अधिकाधिक लोकांना सहभागी होता यावे, या हेतूने ही पद्घती सुरू करण्यात आली आहे. यात लोकांना देश-विदेशात कुठेही बसून वन विभागातील लाकडांची आॅनलाईन खरेदी करता येणार आहे. मात्र या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सुरुवातीला प्रत्येकाला आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीला एक सांकेतिक क्रमांक दिला जाईल. शिवाय खरेदी व्यवहारासाठी ईएमडी रक्कम जमा करावी लागेल. यानंतर ती व्यक्ती थेट लिलाव प्रक्रि येत सहभागी होईल. वन विभागाने पहिल्या टप्प्यात बल्लारशा येथे हा ई-लिलाव सुरू केला असून, यानंतर परतवाडा व यवतमाळ येथील जोडमोहा डेपोतसुद्घा ही पद्घती सुरू करण्याचा मानस असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. सध्या बल्लारशा येथील लिलावासाठी प्रत्येक महिन्यातील १६ व १७ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या दोन्ही दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत हा ई-लिलाव चालणार आहे. या पद्घतीमुळे लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून, वन विभागाच्या तिजोरीतील महसूल वाढणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)बल्लारशा डेपोतून १०० कोटींची विक्री वन विभागाला लाकूड विक्रीतून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. यात एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथील डेपोतून वर्षाला शंभर कोटींपेक्षा अधिकची विक्री होत असल्याचे यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक बी. पी. सिंग यांनी सांगितले. तसेच परतवाडा येथे ४० ते ५० कोटी व यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा येथे १० कोटीपर्यंतची विक्री होत असल्याचेही ते म्हणाले.