लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी न्यायाधीश मास्क लावून व अन्य आवश्यक काळजी घेऊन कामकाज करीत आहेत. वकीलही मास्क लावून युक्तिवाद करीत आहेत. न्यायालयात प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझर व साबणाने हात स्वच्छ केले जात आहेत.देशावरील कोरोनाचे संकट घालविण्यासाठी सर्वस्तरावर आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. न्यायालयांनीही स्वत:ला केवळ तातडीची सुनावणी आवश्यक असलेल्या प्रकरणापुरते सीमित केले आहे. अशी फार कमी प्रकरणे न्यायालयापुढे येत असली तरी सुरक्षेकरिता सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. अॅड. अनुप गिल्डा हे गुरुवारी सरकारी रुग्णालयाच्या विकासासंदर्भातील प्रकरणात युक्तिवाद करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेले होते. ते या प्रकरणात न्यायालय मित्र आहेत. त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व वकील कोरोनापासून स्वत:ला वाचविण्यासाठी आवश्यक काळजी घेत असल्याचे सांगितले. हे प्रकरण ऐकण्यासाठी न्यायमूर्ती सुनील शुक्रे मास्क लावून न्यायालयात बसले होते. वकील व न्यायालयातील सर्व कर्मचाऱ्यांनीही मास्क लावले होते. न्यायालयात प्रवेश करण्यापूर्वी सर्वांचा ताप तपासण्यात आला. तसेच, सॅनिटायझर व साबणाने हात स्वच्छ करायला लावले गेले, अशी माहिती अॅड. गिल्डा यांनी दिली.जिल्हा व सत्र न्यायालय आणि अन्य कनिष्ठ न्यायालयांतील न्यायाधीशही मास्क लावून प्रकरणे ऐकत आहेत. वकीलदेखील मास्क लावून व सॅनिटायझरने हात स्वच्छ करून न्यायालयात जात आहेत. जास्त गर्दी झाल्यास सर्वांना एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवायला सांगितले जाते, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी दिली. जिल्हा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अॅड. कमल सतुजा यांनी संघटनेच्या वतीने न्यायाधीशांना व वकिलांना सॅनिटायझर वितरित करण्यात आल्याची माहिती दिली.अशी वेळ पहिल्यांदाच आलीन्यायालयामध्ये एवढी दक्षता घेण्याची वेळ पहिल्यांदाच आली. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी न्यायालयात खूप काळजी घेतली जात आहे. तीन-चार प्रकरणे सुनावणीसाठी असल्यास एकावेळी केवळ एकच प्रकरणातील वकिलाला न्यायालयात प्रवेश दिला जातो. तसेच, उर्वरित वकिलांमध्ये सुरक्षित अंतर ठेवले जाते. मास्क लावायला सांगितले जाते. न्यायालय परिसरात विनाकाम कुणालाही येऊ दिले जात नाही.अॅड. शशिभूषण वहाणे, हायकोर्ट.
नागपुरात कोरोनामुळे न्यायाधीश मास्क लावून करताहेत काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 8:57 PM
कोरोनापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी न्यायाधीश मास्क लावून व अन्य आवश्यक काळजी घेऊन कामकाज करीत आहेत. वकीलही मास्क लावून युक्तिवाद करीत आहेत.
ठळक मुद्देवकीलही घेताहेत काळजी : हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझरचा वापर