शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

काँग्रेस मागवणार ‘वर्क प्रोफाईल’

By admin | Published: September 24, 2016 12:59 AM

काँग्रेसच्या तिकिटावर महापालिकेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना आधी पक्षासाठी,

इच्छुक उमेदवारांकडून घेणार हिशेब : गांधी जयंतीपासून अर्ज वितरण कमलेश वानखेडे  नागपूरकाँग्रेसच्या तिकिटावर महापालिकेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना आधी पक्षासाठी, जनतेसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा पक्षाकडे सादर करावा लागणार आहे. पक्षातर्फे इच्छुकांकडून ‘वर्क प्रोफाईल’ मागविले जाणार आहे. गांधी जयंतीला २ आॅक्टोबरपासून या संबंधीचे अर्ज देवडिया काँग्रेस भवनातून वितरित केले जाणार असून १५ आॅक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसतर्फे हा प्रयोग केला जाणार आहे. आजवर निवडणूक काळात पक्षातर्फे थेट उमेदवारी अर्ज वितरित केले जात होते. भरून आलेल्या अर्जांच्या आधारावर मुलाखती घेतल्या जात होत्या. आता त्यापूर्वी एक कवायत केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून त्यांनी केलेल्या कामांची माहिती मागविली जाणार आहे. यासाठी पक्षातर्फे एक अर्ज छापण्यात आला आहे. संबंधित अर्ज इच्छुक उमेदवाराला नि:शुल्क दिला जाईल. या अर्जात उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे पुराव्यासह सादर करायची आहेत. इच्छुक उमेदवार कोणत्या प्रभागातून लढण्यास इच्छुक आहे, पक्षाने त्यालाच उमेदवारी का द्यावी, पक्षासाठी संबंधिताने आपल्या भागात कोणकोणते उपक्रम राबविले, त्या भागातील जनतेचे कोणते प्रश्न कोणत्या प्रकारे सोडविले.प्रत्येक बूथवर हवी १५ मतदारांची शिफारसकाँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराला उमेदवारीची दावेदारी पक्की करण्यासाठी प्रत्येक बूथवरील किमान १५ मतदारांची शिफारस मिळवावी लागणार आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार असल्यामुळे वाढीव बूथ रचनेनुसार एका प्रभागात साधारणत: ७० ते ८० बूथ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक बूथवर समर्थक मिळविताना इच्छुक उमेदवाराचा कस लागणार आहे. इच्छुक उमेदवाराला जनतेचे पाठबळ आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी हा प्रयोग केला जाणार आहे. जनतेची उमेदवार निवडीसाठी मदत वेळेवर उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक असते. बरेच कार्यकर्ते मोठमोठ्या शिफारशी घेऊन येतात. यावेळी मात्र शिफारशींपेक्षा प्रत्यक्षात प्रभागात केलेले काम विचारात घेऊन उमेदवारी दिली जाईल. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ‘वर्क प्रोफाईल’ मागविण्यात येणार आहे. पक्षाला लोकांमध्ये काम करणारा उमेदवार निवडण्यासाठी याची निश्चितच मदत होईल. - विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस