स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामांना गती देण्याचे निर्देश ऑक्टोबर २०२० मध्ये स्मार्ट ॲड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडच्या सिटी लेव्हल ॲडव्हायझरी फोरमच्या बैठकीत देण्यात आले होते. दुदैवाने वर्षभरानंतरही यात काही बदल झालेला नाही. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामुळे प्रकल्पाचे काम ठप्प झाले, भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होते. मुुंढे गेले, पण प्रकल्पाला गती मिळालेली नाही.
...
असा आहे टेंडर शुअर प्रकल्प
-प्रकल्पावरील खर्च -६५० कोटी
-झालेला खर्च -१३८ कोटी
-५३ किलोमीटर लांबीचे रस्ते
-झालेले रस्ते १२.३६ किलोमीटर
-प्रस्तावित पुलांचे निर्माण-२८
-१० पुलांचे निर्माण प्रगतिपथावर
-४ जलकुंभाचे निर्माण प्रगतिपथावर
....
प्रकल्पामुळे असे आहेत बाधित
बाधित घरे -१,१४६
प्लाटधारक -४७१
अतिक्रमणधारक-११३
भाडेकरू -६१
एकूण २,३९१
....
स्मार्ट सिटीवर होणारा एकूण खर्च : ३५८८.९७ कोटी
केंद्र सरकारकडून मंजूर निधी : १००० कोटी रुपये
मिळालेला निधी : ४५३ कोटी रुपये
आतापर्यंत खर्च : १८० कोटी