शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

भूमिगत टँकची सफाई करताना मजुराचा गुदमरून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:47 AM

एका केमिकल कंपनीतील भूमिगत आॅईल टँकची सफाई करताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने तीन मजूर गुदमरून बेशुद्ध झाले. उपचारादरम्यान त्यातील एकाचा करुण अंत झाला तर दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान कामठी मार्गावरील भिलगावच्या गोवर्धन एनर्जी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स प्रा. लि. या कंपनीत ही घटना घडली.

ठळक मुद्देविषारी वायूमुळे दोघे गंभीर : यशोधरानगरातील कंपनीत घडली घटना

लोकमत न्यूज नटवर्कनागपूर : एका केमिकल कंपनीतील भूमिगत आॅईल टँकची सफाई करताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने तीन मजूर गुदमरून बेशुद्ध झाले. उपचारादरम्यान त्यातील एकाचा करुण अंत झाला तर दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान कामठी मार्गावरील भिलगावच्या गोवर्धन एनर्जी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स प्रा. लि. या कंपनीत ही घटना घडली.चोरकू ऊर्फ छोटू (रा. गोपाल गंज, जि. सिवनी, मध्यप्रदेश) असे मृत मजुराचे नाव आहे. तर, हरिप्रसाद ऊर्फ राजू डेहरिया (३८) आणि कृष्णकुमार झारिया (३८) गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल असलेल्या मजुरांची नावे आहेत.सूत्रानुसार ही कंपनी नीलेश महाजन, राहुल आगोजी आणि कपिल चांडक हे भागीदारीत चालवतात. कंपनी परिसरात जमिनीच्या आत आॅईलची १० हजार लिटरची टँक आहे. यात आॅईल टाकण्यासाठी एक गोलाकार झाकण आहे. ठेकेदार प्रकाश लिल्लारे यांना कंपनी आणि टँकच्या सफाईचे काम देण्यात आले होते. सोमवारी सफाई करण्यासाठी टँकला ९० टक्के खाली करण्यात आले होते. दुपारी १२ वाजता टँकचे झाकण उघडण्यात आले. सर्वप्रथम चोरकू ऊर्फ छोटू टँकमध्ये उतरला. बरेच वेळा आवाज देऊनही तो बाहेर आला नाही. त्यामुळे राजू टँकमध्ये उतरला. तो देखील बराच वेळ होऊन बाहेर आला नाही. वारंवार आवाज देऊन त्यांच्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने कृष्णकुमार टँकमध्ये उतरला अन् तो देखील चोरकू तसेच राजूसारखा गुदमरून बेशुद्ध पडला. दरम्यान, टँकच्या सफाईसाठी गेलेले तीन मजूर बराच वेळ होऊनही टँकबाहेर न आल्याने आणि मोठमोठ्याने आवाज देऊनही त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी अग्निशमन दलाला सूचित केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन टँकमधून बेशुद्धावस्थेत असलेल्या तिघांनाही बाहेर काढले. राजू व कृष्णकुमारला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चोरकूला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सायंकाळी ६.३० ते ७ च्या सुमारास चोरकूला मृत घोषित केले. या घटनेमुळे कंपनी परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. सफाईचे काम हाती घेण्यात आलेली टँक अनेक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे टँकमध्ये विषारी वायू तयार झाला असावा आणि मजूर गुदमरून बेशुद्ध झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज संबंधितांनी बांधला आहे.पायात दोरीचा फास अडकवून बाहेर काढलेदरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन अधिकारी एस. बी. रामगुनावार आपल्या सहकाºयांसोबत कंपनीत पोहोचले. टँकमध्ये तिघेही बेशुद्ध पडल्याचा अंदाज आल्यामुळे आतमध्ये विषारी वायू असावा, असा त्यांना संशय आला. त्यामुळे जवानांना टँकमध्ये उतरविणे जीवाशी खेळण्यासारखे आहे, हे लक्षात घेत त्यांनी मजुरांना बाहेर काढण्यासाठी युक्ती लढविली. त्यानंतर दोरीचा फास तयार करून तो मजुरांच्या पायात अडकवण्यात आला आणि त्यांना बाहेर काढण्यात आले.व्यवस्थापक आणि ठेकेदार गजाआडतिघेही मजूर अप्रशिक्षित होते. याची माहिती असूनही त्यांचे जीव धोक्यात टाकून त्यांना कुठलीही सुरक्षा उपलब्ध न करता कंपनी व्यवस्थापनाने त्यांना टँकमध्ये उतरवले. त्याचमुळे एका गरीब मजुराचा मृत्यू झाला आणि दोघे मृत्यूशी झुंज देत आहेत. या दुर्घटनेला कंपनीचा व्यवस्थापक अमित महाजन (४०, रा. कामठी) आणि सफाईचे कंत्राट घेणारा प्रकाश लिल्लारे (३८, रा. पार्वतीनगर, वांजरा) या दोघांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा अंदाज बांधून यशोधरानगर पोलिसांनी या दोघांविरुद्ध कलम ३०८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. रात्री या दोघांनाही अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यू