लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेगाड्यांच्या सफाईचे कंत्राट रेल्वे प्रशासनाने एच. एस. सर्व्हिस प्रोव्हायडरला दिले. या कंपनीने ३५ कामगार कामावर ठेवले. लॉकडाऊनच्या काळात २२ मार्चपासून या कामगारांनी रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांच्या सफाईची जबाबदारी पार पाडली. परंतु संबंधित कंपनीने मार्च महिन्यापासूनचे वेतन न दिल्यामुळे सोमवारी या कामगारांनी संप पुकारून रेल्वेगाड्यांच्या सफाईवर बहिष्कार टाकला. त्यामुळे दिवसभरात एकाही रेल्वेगाडीची सफाई होऊ शकली नाही.नागपूर रेल्वेस्थानकावर ‘क्लीन ट्रेन स्टेशन’ अंतर्गत सफाईचे कंत्राट एच. एस. सर्व्हिस प्रोव्हायडर या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने दोन पाळ्यामध्ये ७० कर्मचाऱ्यांकडून ठरवून दिलेल्या रेल्वेगाड्यांची सफाई करणे अपेक्षित आहे. परंतु कंपनीने केवळ ३५ कामगारच कामावर ठेवले आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ आणि दुपारी २ ते रात्री १० या दोन पाळ्यात प्रत्येकी १७ कामगार काम करतात. मार्च महिन्यात रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यान, कामगारांसाठी चालविण्यात येणाऱ्या श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरू करण्यात आली. लॉकडाऊनमध्ये दररोज जवळपास २२ रेल्वेगाड्यांच्या सफाईची जबाबदारी पार पाडली. लॉकडाऊनमध्ये कंपनीने सफाई कामगारांना मास्क, सॅनिटायझरचा पुरवठाही केला नाही. याशिवाय तीन महिन्यांचे वेतनही दिले नाही. सातत्याने वेतनाची मागणी करूनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. तीन महिन्यांचे वेतन अडकल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे सोमवारी या कामगारांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला. सर्व कामगार ‘डीआरएम’ कार्यालयात पोहचले. तेथे त्यांनी कंपनीचे व्यवस्थापक पुरण काळे यांना वेतनाची मागणी केली. त्यानंतर कामगारांचे दोन प्रतिनिधी रेल्वेचे अधिकारी कमलेश कुमार यांना भेटले. त्यांनी काम सुररू ठेवा, बिल पास झाल्यानंतर वेतन मिळेल असे सांगितले. परंतु तीन महिन्यांचे वेतन अडकल्यामुळे कामगार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. वेतन मिळाल्याशिवाय काम सुरू करणार नसल्याची माहिती विजय राऊत, कुणाल जनबंधू, मोसम दहाटे, रितीक पिलारे, रितेश जनबंधू, निकेश खरे, प्रताप खरे, राम डोंगरे, तुषार मानमोडे, रवी ठाकरे, अमन डोंगरे यांनी दिली. संपामुळे कामगारांनी एकाही गाडीची स्वच्छता केली नाही. अखेर रेल्वे प्रशासनाला इतर कर्मचारी सफाईच्या कामासाठी नेमण्याची पाळी आली.वेतनही मिळते कमी‘एच. एस. सर्व्हिसेसने नियमानुसार कामगारांना एका दिवसाचे ६०५ रुपये देण्याची गरज आहे. परंतु कंपनी केवळ ३०५ रुपयेच देत असल्याचा आरोप कामगारांनी केला. याशिवाय दिवाळीचा बोनस आणि इतर सुविधाही देण्यात येत नाहीत. वेतनवाढीची मागणी केल्यास कंपनीचा व्यवस्थापक कामावरून काढून टाकण्याची धमकी देत असल्याचे कामगारांनी सांगितले.लवकर देऊ कामगारांचे वेतन‘लॉकडाऊनमुळे कामगारांच्या वेतनाची बिले अडकली होती. परंतु त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच कामगारांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.’एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
कामगारांनी टाकला रेल्वेगाड्यांच्या सफाईवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 7:18 PM
रेल्वेगाड्यांच्या सफाईचे कंत्राट रेल्वे प्रशासनाने एच. एस. सर्व्हिस प्रोव्हायडरला दिले. या कंपनीने ३५ कामगार कामावर ठेवले. लॉकडाऊनच्या काळात २२ मार्चपासून या कामगारांनी रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांच्या सफाईची जबाबदारी पार पाडली. परंतु संबंधित कंपनीने मार्च महिन्यापासूनचे वेतन न दिल्यामुळे सोमवारी या कामगारांनी संप पुकारून रेल्वेगाड्यांच्या सफाईवर बहिष्कार टाकला. त्यामुळे दिवसभरात एकाही रेल्वेगाडीची सफाई होऊ शकली नाही.
ठळक मुद्दे‘सीटीएस’ कामगारांचा संप : तीन महिन्यांपासून वेतन अडकले