रेवराल : गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचण्यात अडसर निर्माण झाला. मात्र यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेत कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन देणे सुरू केले आहे. त्यानुसार गट ग्रामपंचायत पिपरी यांची परवानगी घेत चरभा येथे सेंद्रिय शेती शिबिर घेण्यात आले. जि.प.चे कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी शिबिराचे उद्घाटन केले. याप्रसंगी पिपरीचे उपसरपंच चक्रधर गभणे, पंचायत समिती सदस्य स्वप्नील श्रावणकर उपस्थित होते. शिबिरात तज्ञ्ज्ञांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती पद्धती व उपयोगिता यावर मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत सदस्य चंद्रभान किरपान, संगिता बरबटे, रमेश बरबटे, श्रीकांत किरपान, लक्ष्मण गडे, चदंन पटिये, शंकर पटिये आदी शिबिरात सहभागी झाले होते.
--
मौद्यातील रस्ते दुरुस्त करा
मौदा : मौदा येथील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात मनसेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता यांना निवेदन सादर करण्यात आले. मौदा येथील रबडीवाला टी-पाॅईंट ते केसलापूर रस्ता व मौदा ते रामटेक या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात मृणाल संजय तिघरे, नीलेश लांडगे, प्रशांत मानकर, प्रफुल बरगटकर, नयन किरपान आदींचा समावेश होता.