लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाघांचे संरक्षण, बेशुद्धीकरण आणि पुनर्वसन पथकाचे कौशल्य विकास प्रशिक्षण या विषयावर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली, भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने सिल्लारी येथील अमलतास निसर्ग पर्यटन केंद्रात तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा अतिरिक्त महासंचालक डॉ. अनुप नायक, महाराष्ट्र राज्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक बी. ए. हुडा यांनी केले. अनुप नायक यांनी राज्यांना सक्षम करण्याचे धोरण असून भविष्यातील संघर्ष वेळीच आणि प्रभावीपणे हाताळले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक हुडा यांनी बदलत्या पार्श्वभूमीवर सध्याच्या कार्यपद्धतीत बदल करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.भारतातील वाढता मानव वन्यजीव संघर्ष पाहता व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रिय कर्मचारी आणि पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाघाच्या बचाव, बेशुद्धीकरण आणि पुनर्वसनाबाबत प्रशिक्षण देणे हा या कार्यशाळेमागील उद्देश आहे. कार्यशाळेत भारतीय वन्यजीव संस्थेचे वैज्ञानिक डॉ. बिलाल हबीब, डॉ. पराग निगम, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे डॉ. वैभव माथुर, निशांत वर्मा, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. रविकिरण गोवेकर, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अखिलेश मिश्रा, डॉ. संजीव गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाला राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर उपस्थित राहतील.पांढरकवडा येथील मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रशिक्षणामध्ये देशातील ४० प्रशिक्षणार्थ्यांत महाराष्ट्रातील १० प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश आहे. हे प्रशिक्षणार्थी भविष्यामध्ये इतरांना प्रशिक्षित करतील.कार्यक्रमाचे नियोजन पेंचचे उपसंचालक अमलेदु पाठक, वन परिक्षेत्र अधिकारी अतुल देवकर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले. कार्यशाळेत महाराष्ट्रासह छत्तीसगड, उत्तराखंड, मध्यप्रदेश, ओडिशा, झारखंड आणि उत्तर प्रदेश या सात राज्यातील व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यातील आणि संरक्षित क्षेत्राबाहेरील क्षेत्रिय कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी उपस्थित आहेत.
वाघांच्या संरक्षणासाठी नागपूर जिल्ह्यातील सिल्लारीत कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:56 AM
वाघांचे संरक्षण, बेशुद्धीकरण आणि पुनर्वसन पथकाचे कौशल्य विकास प्रशिक्षण या विषयावर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली, भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने सिल्लारी येथील अमलतास निसर्ग पर्यटन केंद्रात तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
ठळक मुद्देविविध राज्यातील प्रशिक्षकांची हजेरी