शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाइकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
5
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
6
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

जागतिक एंकीलॉसिंग स्पॉन्डीलायटिस दिन; पाठीचा कणा बांबूसारखा होणाऱ्या आजाराचा पुरुषांना धोका अधिक

By सुमेध वाघमार | Published: May 05, 2023 5:25 PM

Nagpur News ‘एंकीलोसिंग स्पॉन्डीलायटी’ हा विशिष्ट प्रकाराचा वात रोग आहे. यात  पाठीच्या कण्याची रचना एखाद्या बांबूप्रमाणे होते. एकूण लोकसंख्येपैकी ०.१ ते ०.२ टक्के लोकांमध्ये हा विकार जडण्याचे प्रमाण अधिक असते.

 सुमेध वाघमारे नागपूर : ‘एंकीलोसिंग स्पॉन्डीलायटी’ हा विशिष्ट प्रकाराचा वात रोग आहे. यात  पाठीच्या कण्याची रचना एखाद्या बांबूप्रमाणे होते. ‘आॅटोइम्युनिटी’ आणि काही अज्ञात कारणांनी हा विकार जडतो. एकूण लोकसंख्येपैकी ०.१ ते ०.२ टक्के लोकांमध्ये हा विकार जडण्याचे प्रमाण अधिक असते. हा वातरोग महिलांच्या तुलनेत पुरुषांना होण्याचा धोका पाच पटीने अधिक असतो.  ६ मे रोजी जगभरात एंकीलॉसिंग स्पॉन्डीलायटिस जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला वातरोग तज्ज्ञ व अस्थिरोग तज्ज्ञानी पत्रकारांशी संवाद साधला. 

-काय आहे, एंकीलॉसिंग स्पॉन्डीलायटिससंधिवात तज्ज्ञ डॉ. सौरभ चहांदे म्हणाले, एंकीलॉसिंग स्पॉन्डीलायटिसमध्ये रुग्णाच्या पाठीच्या कणा आणि अस्थिबंद यावर (लिगामेंट्स) दाह आणि सूज येते. दोन मनक्याच्या दरम्यान हळूहळू नव्या हाडाची निर्मिती होते आणि ते कालांतराने ते एकमेकांना चिटकू लागतात. उपचार करवून घेतले नाही तर पुढे सगळे मणके एक होतात व त्यामुळे समोर-मागे, आजुबाजूला वाकण्यास त्रास होतो. एक्स-रे मध्ये बघितल्यास पाठीच्या कण्याची रचना एखाद्या बांबूप्रमाणे दिसते. त्यामुळे जीवनभर व्यंग येऊ शकते.

-औषधोपचार व फिजीओथेरपीने व्यंग टाळता येतो आजाराचे वेळीच निदान होऊन वातरोगतज्ज्ञाच्या सल्ल्याने औषध घेतले, जीवनशैलीतील बदल व फिजियोथेरपीचा अवलंब केल्यास पाठीचा कणा बांबूसारखा होण्यापासून टाळता येतो. त्यामुळे पुढील व्यंग देखील टाळता येते.

-ही आहेत लक्षणेकंबर दुखणे, पार्श्वभावात आलटून-पालटून वेदना होणे, मांड्यांमध्ये वेदना होणे ही प्राथमिक लक्षण आहेत. मुख्य म्हणजे या वेदना मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळी अधिक असतात. सकाळी कंबरेत अकडण राहणे व जसजसा दिवस पुढे जातो; अकडण कमी होऊ लागणे अशी लक्षणे दिसून येतात. रात्री कड बदलताना त्रास होतो. पुढे या वेदना मानेपर्यंत पोहचतात. याशिवाय थकवा, वारंवार लालसर डोळे, छातीत वेदना ही लक्षणेही आढळून येऊ शकतात.

टॅग्स :Healthआरोग्य