लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे आज हजारो-लाखो लोकांना जीवनदान मिळते. त्यामुळे ‘रक्तदान हे जीवनदान’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, आजही समाजात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्या रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने व नियमित रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी २००४ पासून जागतिक आरोग्य संघटना (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करीत असते. ए-बी-ओ या रक्तगटांचा शोध लावणारे आणि रक्तदान संकल्पनेला अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणारे ऑस्ट्रियाचे नोबेल विजेते प्राप्त डॉ. कार्ल लॅन्डस्टेनर यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक रक्तदान दिन आयोजिला जातो.यंदा रक्तदाता दिवसाची थीम ही ‘सेफ ब्लड फॉर ऑल’ सुरक्षित रक्त सर्वांना ही आहे. एचआयव्ही, हेपॅटायटिस या रोगांनादेखील अशुद्ध रक्त स्वीकारल्याने आमंत्रण मिळू शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ८ऑगस्ट २०१६ साली राज्यसभेसमोर ठेवलेल्या अहवालात सांगितले की, गेल्या १६ महिन्यात २२३४ रुग्णांना अशुद्ध रक्त स्वीकारल्याने एचआयव्हीची बाधा झाली आहे. गेल्या सात वर्षात१४,४७४ रक्त स्वीकारणाऱ्यांना रक्तसंक्रमणाने पसरणाºया आजारांचा प्रादुर्भाव झाला आहे. ही सगळी माहिती धक्कादायक असून, रक्त स्वीकारताना आपण याचा विचार करीत नाही. एकदा संक्रमण झाले की वेळ हातून गेली असते. त्या अनुषंगाने सर्वांना सुरक्षित आणि शुद्ध रक्त मिळावे, यासाठी जागृती आवश्यक आहे.काही आजारांवर उपचार करताना रुग्णाला रक्त मिळाले नाही, तर दगावण्याची शक्यता वाढते. शिवाय थॅलेसेमिया, सिकलसेलच्या रोग्यांना नियमित रक्त देणे गरजेचे आहे. मात्र, रक्ताची उणीव मोठ्या प्रमाणात भासते, हे देखील वास्तव आहे. भारतात एकूण लोकसंख्येच्या केवळ ०.९टक्के लोक नियमित रक्तदान करतात. एकूण गरजेच्या अनेकपटीने कमी आहे. विकसित देशात रक्तदान करण्याचे हेच प्रमाण ४ टक्क्यांपर्यंत आहे. म्हणून यंदाच्या थीममध्येसर्वांसाठी रक्त हे एक महत्त्वाचे धेय आहे. अशावेळी ‘सर्वांसाठी रक्त’ हे ध्येय पूर्ण करण्यासाठी तरुणाईने मोठ्या संख्येत रक्तदान केले पाहिजे.कुठल्याही आजाराचा प्रादुर्भाव नसलेले शुद्ध रक्त मिळणे, हा सुद्धा मानवाचा अधिकार आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपासलेले रक्त स्वीकारण्यावर रुग्णांनी जोर दिला पाहिजे. येथील व्यवस्थेनेदेखील रुग्णांना अधिक सुरक्षित व शुद्ध रक्त कसे मिळेल, याकडे विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक आहे. यासंदर्भात जागृती करणे, हे रक्तदाता दिवसाचे आणखी उद्दिष्ट होय.एक पिशवी रक्त दिल्याने तब्बल तीन लोकांचा जीव वाचवता येऊ शकतो. लालपेशी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा अशा तीन घटकांना वेगळे करता येते. त्यामुळे रक्तदान केल्याने किती लोकांचे जीवन आपण वाचवू शकतो, ही जाणीव ठेवून नियमित रक्तदान करण्याचा संकल्प करावा.सर्वात सुरक्षित आयडी नॅट टेस्टेड रक्तरक्त चढवण्यापूर्वी रक्ताची ब्लड बँकेत तपासणी होते. आतापर्यंतच्या आकडेवारीत असे दिसून आले की, रक्तदानाद्वारे स्वीकारलेल्या ६,५०० रक्तपिशव्यांपैकी१०० रक्त पिशव्या या दूषित असतात. दूषित रक्त तपासण्यासाठी ‘न्यूक्लिक अॅॅसिड टेस्ट’म्हणजे नॅट रक्ततपासणी करून घ्यावी लागते. त्यातही तीन प्रकार असून, त्यापैकी आयडी नॅट म्हणजे इन्डिव्हिज्युअल डोनर नॅटद्वारे सर्वाधिक शुद्ध रक्ताची सर्वाधिक शाश्वती मिळते. एमपी आणि एचबी नॅटद्वारे तसेच अन्य एलिसा या रक्त तपासणी तंत्राद्वारे शुद्ध रक्त मिळण्याची शक्यता कमी असते, असे दिसून आले आहे. त्यामुळे आयडी नॅट तंत्रज्ञानाने तपासलेले रक्त स्वीकारण्यास प्राधान्य द्यावे.डॉ. हरीश वरभे, संचालक, लाईफलाईन ब्लड बँक
जागतिक रक्तदाता दिन : रक्तदानाचा टक्का वाढावा, ही अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 1:07 AM
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे आज हजारो-लाखो लोकांना जीवनदान मिळते. त्यामुळे ‘रक्तदान हे जीवनदान’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, आजही समाजात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्या रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने व नियमित रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी २००४ पासून जागतिक आरोग्य संघटना (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करीत असते. ए-बी-ओ या रक्तगटांचा शोध लावणारे आणि रक्तदान संकल्पनेला अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणारे ऑस्ट्रियाचे नोबेल विजेते प्राप्त डॉ. कार्ल लॅन्डस्टेनर यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक रक्तदान दिन आयोजिला जातो.
ठळक मुद्देसुरक्षित रक्त सर्वांसाठी